गर्लफ्रेंडला नवी स्कूटर गिफ्ट द्यायचीये? फक्त २२०० रुपये मंथली EMIमध्ये घेऊन या 'ही' झक्कास स्कूटर

जर तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा मैत्रिणीला गिफ्ट करण्यासाठी स्कूटर शोधत असाल, तर तुम्ही Hero Pleasure Plus चा विचार करू शकता.
गर्लफ्रेंडला नवी स्कूटर गिफ्ट द्यायचीये? फक्त २२०० रुपये मंथली EMIमध्ये घेऊन या 'ही' झक्कास स्कूटर
Published on

हिरो मोटोकॉर्प ही भारतीय बाजारपेठेतील नंबर 1 दुचाकी कंपनी आहे. हिरो बाईक्स आणि स्कूटर गावागावांत पोहोचल्या आहेत. जर तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा मैत्रिणीला गिफ्ट करण्यासाठी स्कूटर शोधत असाल, तर तुम्ही Hero Pleasure Plus चा विचार करू शकता.

ही स्कूटर किफायतशीर तसेच रोजच्या वापरासाठी योग्य आहे. आज आम्ही तुम्हाला Hero Pleasure Plusची ऑन-रोड किंमत, EMI, व्हेरियंट्स आणि फीचर्सबद्दल सांगणार आहोत.

ऑन-रोड किंमत: Hero Pleasure Plus अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. तिच्या बेस LX मॉडेलची ऑन-रोड किंमत सुमारे 85,872 रुपये आहे. तुम्ही ही स्कूटर 15,000 रुपये डाऊन पेमेंट करून खरेदी करू शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला 9.7 टक्के व्याज दराने तीन वर्षांसाठी (36 महिने 2,277 रुपयांचा EMI भरावा लागेल.

तर नवीन Pleasure Plus VX प्रकाराची ऑन-रोड किंमत 90,676 रुपये आहे. जर तुम्ही ही स्कूटर 15,000 रुपये डाउनपेमेंट भरून खरेदी केली, तर तुम्हाला 9.7 टक्के व्याजासह 3 वर्षांसाठी 2,431 रुपये मासिक EMI भरावा लागेल.

याशिवाय Hero Pleasure Plus Xtec Sports मॉडेलची किंमत 88,389 रुपये आहे.जर तुम्ही 15,000 रुपये डाउन पेमेंट करून ही स्कूटर खरेदी केली तर 9.7 टक्के व्याजदराने तुम्हाला तीन वर्षांच्या कालावधीसाठी 2,358 रुपये मासिक EMI भरावा लागेल.

नवीन Pleasure Plus XTEC कनेक्टेड प्रकाराची ऑन-रोड किंमत 99,598 रुपये आहे. जर तुम्ही ही स्कूटर 15,000 रुपयांच्या डाउन पेमेंटने खरेदी केली तर तुम्हाला 9.7 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी 2,718 रुपये मासिक EMI भरावा लागेल.

Hero Pleasure Plus Powertrain: नवीन Hero Pleasure Plus स्कूटर 110 cc सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 8.1 PS ची कमाल पॉवर आणि 8.7 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर 50 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देते.

फीचर्स : या स्कूटरमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलसीडी स्क्रीनसह अनेक फीचर्स आहेत. सुरक्षिततेसाठी स्कूटरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत तर 10-इंच स्टील व्हील दिलेली आहेत. ही व्हील्स 90/100-10 आकाराच्या ट्यूबलेस टायरने सुसज्ज आहेत.

या स्कूटरचे वजन 104 किलो आहे. यात 4.8 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. बाजारात तिची स्पर्धा TVS स्कूटी झेस्ट आणि Honda Dio स्कूटरशी आहे. कृपया हे लक्षात घ्या की ऑन-रोड किंमत आणि EMI पर्याय राज्यानुसार बदलू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in