अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्था लवकरच आपला गाशा गुंडाळणार असून ही शॉर्ट सेलिंग कंपनी बंद होणार आहे. हिंडेनबर्गचे संस्थापक एन. अँडरसन यांनी बुधवारी कंपनीच्या वेबसाईटवर 'पर्सनल नोट' लिहून याची घोषणा केली. अँडरसन यांनी ही माहिती पोस्ट करताच अर्थविश्वातील ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ठरली. या बातमीचा मोठा परिणाम भारताच्या शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपच्या स्टॉकवर झालेला दिसून येत आहे. बातमी व्हायरल होताच अदानी ग्रुपच्या स्टॉकने 'ग्रीन सिग्नल' मध्ये प्रतिसाद दिला असून समूहातील विविध कंपन्यांचे शेअर्स वधारले. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालामुळेच अदानी ग्रुपला जबर फटका बसला होता आणि अब्जावधी रुपयांचे (USD 100 Billion) नुकसान झाले होते.
सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
हिंडेनबर्ग रिसर्च संस्था बंद होणार ही बातमी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंमध्ये आली असून चर्चेचा विषय ठरली आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आणि अदानी यांच्याविषयी प्रचंड मीम्स व्हायरल होत आहेत.
एका एक्स (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्याने अदानी यांचा फोटो पोस्ट करून ''कोणीतरी आज खूप आनंदी आहे'' अशा आशयाची मिश्कील टिप्पणी केली आहे. तसेच मीम्स व्हायरल करताना 'एआय' फोटोंचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे.
'मीम्स'मध्ये राहुल गांधीही 'टार्गेट'
काही नेटकऱ्यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना देखील टार्गेट केले आहे. अदानी ग्रुपविषयी अहवाल देऊन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये खळबळ उडवून दिल्यानंतर या मुद्द्यावर संसदेतही मोठा गदारोळ झाला होता. राहूल गांधी यांनी आपल्या विविध भाषणांदरम्यान हिंडेनबर्गच्या अहवालाच्या आधारे अदानी समूहाच्या चौकशीचा मुद्दा सातत्याने उचलून धरला होता. हाच धागा पकडत एका सोशल मीडिया वापरकर्त्याने राहुल गांधींचा एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
याशिवाय अन्य मिम्स देखील इथे व्हायरल होत आहे. तेही पाहा...
ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी -
अनेक मिम्सपैकी ''ना रहेगा बास, ना बजेगी बासुरीं'' असे लिहिलेली एक पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.
ताल से ताल मिलाओ -
एका वापरकर्त्याने गौतम अदानींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने ताल चित्रपटातील गाण्याच्या ओळींवर गौतम अदानींना अक्षय खन्नाच्या लूकमध्ये दाखवले आहे. पाहा हा व्हिडिओ...
ट्रम्प यांना घाबरून दुकान बंद करण्याचा निर्णय!
काही एक्स वापरकर्त्यांनी हिंडेनबर्ग बंद होणार याला चांगली बातमी म्हणत याचा संबंध थेट अमेरिकेचे होणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जोडला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी (दि.20) अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. एका एक्स वापरकर्त्यांनी म्हटले आहे की, कोणतीही थेट आणि निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी सुत्रांच्या माहितीनुसार ट्रम्प यांना घाबरून दुकान बंद करून हिंडनबर्गने पळण्याचा निर्णय घेतला.