फक्त 12 लाखांत घरी आणा Hondaची 'ही' जबरदस्त SUV, 6 एअरबॅग अन् सनरुफसह अनेक फीचर्स

Honda Elevate SUV: जर तुम्ही नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट 12 लाख रुपये असेल, तर Honda Elevate SUV हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
फक्त 12 लाखांत घरी आणा Hondaची 'ही' जबरदस्त SUV, 6 एअरबॅग अन् सनरुफसह अनेक फीचर्स

जर तुम्ही नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट 12 लाख रुपये असेल, तर Honda Elevate SUV हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. नवीन Honda Elevate SUV ची सुरुवातीची किंमत 11.91 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. तर तिच्या टॉप-एंड व्हेरियंटची किंमत 16.51 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

Honda Elevate SUV चार ट्रिममध्ये (SV, V, VX आणि ZX) भारतीय बाजारात विकली जाते. भारतीय बाजारपेठेत, ती Kia Seltos, Maruti Grand Vitara, Toyota Highrider, Volkswagen Taigun आणि Skoda Kushaq सारख्या SUV बरोबर स्पर्धा करते.

नवीन Honda Elevate ची रचना खूपच आकर्षक आहे. ही एसयूव्ही फिनिक्स ऑरेंज पर्ल, ऑब्सिडियन ब्लू पर्ल, रेडियंट रेड मेटॅलिक, प्लॅटिनम व्हाईट यासह विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. या एसयूव्हीमध्ये 5 लोक सहज प्रवास करू शकतात.

होंडा एलिव्हेट पॉवरट्रेन:

नवीन एलिव्हेट एसयूव्ही 1.5-लिटर, DOHC, 4-सिलेंडर, नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 121 PS कमाल पॉवर आणि 145 Nm पीक टॉर्क निर्माण करते.

या एसयूव्हीमध्ये व्हेरियंटनुसार 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. FWD (फ्रंट व्हील ड्राइव्ह) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही कार 15.31 ते 16.92 किमी प्रति लिटर मायलेज देते.

होंडा एलिव्हेट फीचर्स:

या कारमध्ये अनेक आकर्षक फीचर्स आहेत. 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7 इंचाचा सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले, ऑटोमेटीक क्लायमेंट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, सनरूफ आणि 458 लिटर बूट स्पेस आहे.

याशिवाय एसयूव्हीमध्ये 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम, लेन वॉच कॅमेरा आणि वन-टच इलेक्ट्रिक सनरूफ, होंडा कनेक्टसह 8-स्पीकर ऑडिओ सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि एचएफटी स्विच, मल्टी-एंगल रिअर व्ह्यू कॅमेरा यासह अनेक विशेष फीचर्स देण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in