
आजच्या काळात बाईक हा जीवनाचा एक भाग बनली आहे. सामान्य माणसांपासून ते मोठ्या सेलिब्रिटींनाही बाइक चालवायला आवडते. नॉर्मल कम्यूटर बाईकपासून ते महागड्या क्रूझर बाइकपर्यंत भारतात सर्व प्रकारच्या बाईक विकल्या जातात. परंतु भारतातील मध्यमवर्गीय लोक परवडणाऱ्या बजेट बाईक शोधात असतात.
तुम्हाला पण परवडणाऱ्या किमतीत नवीन बाईक घ्यायची आहे का? तुमचं उत्तर जर हो असेल, तर Honda Shine 100 तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. बजेट फ्रेंडली असण्यासोबतच ही बाईक उत्कृष्ट मायलेज देखील देते.
Honda Shine 100 ऑन-रोड किंमत आणि EMI:
या बाइकची ऑन-रोड किंमत 78,974 रुपये आहे. तुम्ही 15,000 रुपये डाउन पेमेंट भरून ही बाईक खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला 9.7% दराने 2,055 रुपये मासिक EMI भरावा लागेल.
Honda Shine 100 ची फीचर्स:
या बाईकला उर्जा देण्यासाठी Honda चे eSP तंत्रज्ञान असलेले अगदी नवीन 100 cc OBD2 Fi इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 7.3 hp पॉवर आणि 8.5 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.
ही बाईक 4-स्पीड गिअरबॉक्ससह येते. कंपनीच्या दाव्यानुसार 68 kmpl पर्यंत मायलेज देते. ही नवीन बाईक 5 आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ गोल्ड, ब्लॅक विथ ब्लू इत्यादी रंगाचा समावेश आहे.
होण्डा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया शाईन100 बाईकला 10 वर्षांची वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 7 वर्षे पर्यायी विस्ताऑप्शनल एक्सटेंडेड वॉरंटी) ऑफर करत आहे. होण्डा शाईन100 मध्ये 677 मिमी लांब सीट आहे, जी आरामदायी राइडिंग अनुभव देते.
होण्डा शाईन100 बाईकची उंची 786 mm आहे. या बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला ट्विन सस्पेन्शन आहे. याशिवाय, बाईकमध्ये इन-बिल्ट साइड स्टँड इंजिन इनहिबिटर आणि ड्युअल रिअर शॉक, ड्युअल-पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोल, हॅलोजन लाइटिंग युनिट देण्यात आलं आहे.
ब्रेकिंगचा विचार केला तर याला कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे, यात पुढच्या चाकावर 130 मिमी ड्रम ब्रेक्स आहेत, तर मागील बाजूस 110 मिमी ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत.