
नवी दिल्ली : मजबूत मागणी, उच्च उत्पादन खर्च यामुळे आठ प्रमुख शहरांमध्ये डिसेंबर तिमाहीत घरांच्या किमती सरासरी १० टक्क्यांनी वाढल्या आहेत, असे कॉलियर, क्रेड आणि कॉलिय क्रेडच्या अहवालात म्हटले आहे.
रिअलटर्सची संस्था क्रेडाई, रिअल इस्टेट सल्लागार कॉलियर्स इंडिया आणि डेटा ॲनालिटिक फर्म लायसेस फोरास यांनी मंगळवारी त्यांचा संयुक्त अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ या कालावधीत दिल्ली-एनसीआरमध्ये वार्षिक ३१ टक्के वाढ झाली आहे. २०२१ पासून सलग १६ व्या तिमाहीत घरांच्या सरासरी किमती वाढल्या आहेत, असे अहवालात म्हटले आहे. आठही प्रमुख शहरांमध्ये किमतीत वाढ दिसून आली.
क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी म्हणाले, घरांच्या किमतीतील सातत्यपूर्ण वाढ घर खरेदीदारांमधील मजबूत आत्मविश्वास अधोरेखित करते, जे प्रशस्त राहणीमान आणि जीवनशैली सुधारणांना प्राधान्य देते. विकसित प्राधान्ये आणि जीवनशैली सुधारण्यासाठी हे प्रमुख प्रेरक आहेत. बांधकाम आणि भूसंपादनातील खर्चाचा दबाव देखील किंमती वाढवण्यात लक्षणीय योगदान देत आहेत, असे इराणी म्हणाले.
कॉलियर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बादल याज्ञिक यांना विश्वास आहे की, २०२५ मध्ये पहिल्या आठ शहरांमध्ये सरासरी किमतींमध्ये अशीच वाढ दिसून येईल. कर्जाच्या व्याजदरात आणखी कपातीमुळे बहुतेक शहरांमध्ये घरांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, सरासरी निवासी किमती २०२५ मध्ये वार्षिक आधारावर समान पातळीवर वाढू शकतात, असे याज्ञिक म्हणाले.
लायसेस फोरासचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर म्हणाले की, गेल्या तिमाहीत नवीन लाँचच्या नियंत्रणामुळे विक्रीत किरकोळ घट झाली आहे. आम्ही परवडणाऱ्या आणि मध्यम-विभागातील पुरवठा आणि विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा करतो. ज्यामुळे पुरवठ्याची रचना बदलेल, जी गेल्या चार वर्षांपासून लक्झरी विभागाकडे झुकलेली आहे, असे कपूर म्हणाले.
मुंबई एमएमआरमध्ये घरे ३ टक्क्यांनी महाग
शहरांमध्ये, मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (एमएमआर) ने किमतींमध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली असून २०,७२५ रुपये प्रति चौरस फूट झाली आहे. पुण्यात ९ टक्के वार्षिक किमतीत वाढ होऊन हा दर ९,९८२ रु. प्रति चौरस फूट झाली, असे आकडेवारीवरून दिसून आले. अहमदाबादमध्ये ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ या कालावधीत चटई क्षेत्राच्या आधारावर सरासरी घरांच्या किमती वार्षिक १५ टक्क्यांनी वाढून ७,७२५ रुपये प्रति चौरस फूट झाल्या. बंगळुरूमध्ये २३ टक्क्यांनी वाढ होऊन हा दर १२,२३८ रुपये प्रति चौरस फूट झाले. चेन्नईमध्ये घरांच्या किमती ६ टक्क्यांनी वाढून ८,१४१ रुपये प्रति चौरस फूट झाल्या, तर दिल्ली-एनसीआरमध्ये ३१ टक्क्यांनी वाढ होऊन ते ११,९९३ रुपये प्रति चौरस फूट झाले. हैदराबादमध्ये दर २ टक्क्यांनी वाढून ११,३५१ रुपये प्रति चौरस फूट झाला. कोलकात्यात किमती १ टक्क्यांनी वाढून ७,९७१ रुपये प्रति चौरस फूट झाली.