घरे सरासरी १० टक्‍क्‍यांनी महागली

निवासी रिअल इस्‍टेटमध्‍ये सतत मागणी वाढत असल्याने २०२४च्‍या पहिल्‍या तिमाहीत आठ अव्‍वल शहरांमधील घरांच्‍या किमतींमध्‍ये सरासरी वार्षिक १० टक्‍क्‍यांची वाढ
घरे सरासरी १० टक्‍क्‍यांनी महागली
Published on

बंगळुरू : निवासी रिअल इस्‍टेटमध्‍ये सतत मागणी वाढत असल्याने २०२४च्‍या पहिल्‍या तिमाहीत आठ अव्‍वल शहरांमधील घरांच्‍या किमतींमध्‍ये सरासरी वार्षिक १० टक्‍क्‍यांची वाढ झाली. बंगळुरू, दिल्‍ली एनसीआर, अहमदाबाद आणि पुणे येथील सरासरी घरांच्‍या किमतींनी दोन-अंकी तर बहुतांश शहरांमधील घरांच्‍या किमतींमध्‍ये २ ते ७ टक्‍के वाढ झाली. क्रेडाई (CREDAI) आणि लियासेस फोरस (Colliers Liases Foras) यांनी याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

गृहनिर्माण बाजारपेठ खरेदीदार व विकासकांसाठी अनुकूल राहिली असली तरी भारतातील विक्री न झालेल्‍या सदनिकांच्‍या यादीमध्‍ये वार्षिक ३ टक्‍क्‍यांची किरकोळ वाढ झाली. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे पुण्‍यातील विक्री न झालेल्‍या सदनिकांच्‍या यादीमध्‍ये वार्षिक १० टक्‍क्‍यांची घट झाली. तर दिल्‍ली एनसीआर व अहमदाबादमध्ये वार्षिक ८ टक्‍क्‍यांची घट झाली. २०२४ च्‍या पहिल्‍या तिमाहीत अव्‍वल आठ शहरांमधील विक्री न झालेल्‍या सदनिकांची संख्‍या जवळपास १० लाख होती, ज्‍यामध्‍ये एमएमआरचा ४० टक्‍क्‍यांचा मोठा वाटा होता. उत्तम मागणीमुळे तिमाही आधारावर विक्री न झालेल्‍या सदनिकांमध्‍ये काहीशी घट झाली. हैदराबाद व बंगळुरू येथील विक्री न झालेल्‍या सदनिकांच्‍या यादीमध्‍ये वार्षिक वाढ झाली असली तरी दोन्‍ही शहरांमध्‍ये तिमाहीत घट झाली. उपलब्‍ध घरांचा साठा व अपेक्षित मागणीवर लक्ष ठेवून राहण्‍याची, तसेच नजीकच्‍या काळात योग्‍य वेळी विकासक त्‍यांचे नवीन गृहप्रकल्प लाँच करण्‍याची अपेक्षा आहे.

क्रेडाई नॅशनलचे अध्‍यक्ष बोमन इराणी म्‍हणाले, घरांच्‍या किमतींमध्‍ये वाढ झाल्‍यामुळे देशभरातील गृहखरेदीदारांमध्‍ये विशेषत: प्रीमियम व लक्‍झरी घरांप्रती मागणीमध्‍ये वाढ झाल्‍याचे दिसते.

''भारतातील अव्‍वल ८ शहरांमधील प्रॉपर्टी किमतींमध्‍ये वार्षिक १० टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली, लक्‍झरी मागणी, आगामी पायाभूत सुविधा प्रकल्प आणि धोरणात्‍मक लाँचेस् यांसारखे घटक या वाढीला गती देतात,'' असे लियासेस फोरसचे व्‍यवस्‍थापकीय संचालक पंकज कपूर म्‍हणाले.

आलिशान घरांच्या मागणीत वाढ

''गेल्‍या काही तिमाहींमध्‍ये विशेषत: लक्‍झरी व अल्‍ट्रा-लक्‍झरी विभागांमध्‍ये सदनिकांसाठी मागणी उच्‍च राहिली आहे. मुंबई व दिल्‍ली सर्वोच्‍च करोडपतींसह शहरांच्‍या जागतिक यादीमध्‍ये असण्‍यासह बंगळुरू संपत्ती वाढ आणि करोडपती व्‍यक्‍तींच्‍या संख्‍येमध्‍ये वाढ यासंदर्भात झपाट्याने उदयास येत असलेले शहर आहे. वाढते आर्थिक हब बंगळुरूमधील विशेषत: पेरिफेरी व आऊटर नॉर्थ मायक्रो मार्केटमध्‍ये लक्‍झरी निवासी प्रकल्‍पांचे अधिक प्रमाणात लाँचेस् झाले आहे. निवासी विकासक लक्‍झरी/अल्‍ट्रा-लक्‍झरी विभागातील वाढत्‍या मागणीचा फायदा घेतील आणि श्रीमंत गृहखरेदीदरांच्‍या सूक्ष्‍मदर्शी मागण्‍यांची पूर्तता करणारे अधिक उच्‍च दर्जाचे प्रकल्‍प लाँच करतील, असे कॉलियर्स इंडियाचे वरिष्‍ठ संचालक व संशोधन प्रमुख विमल नादर म्‍हणाले.

पुण्यात उत्तम मागणी, विक्री न झालेल्या घरांची संख्या १० टक्के घसरली

पुण्‍यातील विक्री न झालेल्‍या सदनिकांच्‍या यादीमध्‍ये वार्षिक १० टक्‍क्‍यांची घट दिसण्‍यात आली. आठ प्रमुख शहरांपैकी पुण्‍यातील विक्री न झालेल्‍या सदनिकांच्‍या यादीमध्‍ये मोठी घट दिसण्‍यात आली. विक्री न झालेल्‍या सदनिकांमध्ये वार्षिक १० टक्‍क्‍यांची घट झाली तरी शहरामध्‍ये सदनिकांची उत्तम मागणी दिसून येते. विक्री न झालेल्‍या सदनिकांच्‍या यादीमधील घट होण्‍यामुळे सरासरी घरांच्‍या किमतींत वार्षिक १३ टक्‍क्‍यांची वाढ झाली. उच्‍चस्‍तरीय व लक्‍झरी विभागांमध्‍ये मोठ्या प्रमाणात झालेल्‍या लाँचेस‌्मुळे किमतींमध्‍ये ही वाढ झाली. कॅम्‍प व बाणेर अशा प्रमुख ठिकाणी किमतीत मोठी वार्षिक वाढ २० ते २३ टक्‍क्‍यांदरम्‍यान होती. मेट्रो लाइन ३ व पुणे रिंग रोड आणि मार्की ग्रेड ए व्‍यावसायिक विकासांची पूर्तता अशा प्रमुख पायाभूत प्रकल्‍पांच्‍या प्रगतीसह बाणेर, चिंचवड, शिवाजीनगर व नगर रोड यांसारख्‍या क्षेत्रांमधील निवासी मागणीमध्‍ये नजीकच्‍या व मध्‍यम काळात वाढ होण्‍याची शक्‍यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in