घरांच्या विक्रीत ५ टक्के वाढ, पण मागणी ८ टक्क्यांनी घसरली; आघाडीच्या सात शहरांबाबत तिमाही अहवाल

एप्रिल ते जून या कालावधीत सात प्रमुख शहरांमधील घरांची विक्री वार्षिक ५ टक्क्यांनी वाढून सुमारे १.२ लाख युनिट्सवर पोहोचली आहे. तर, किमतीत वाढ झाल्याने घरांची मागणी मागील तिमाहीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी घसरली...
घरांच्या विक्रीत ५ टक्के वाढ, पण मागणी ८ टक्क्यांनी घसरली; आघाडीच्या सात शहरांबाबत तिमाही अहवाल
Published on

नवी दिल्ली : एप्रिल ते जून या कालावधीत सात प्रमुख शहरांमधील घरांची विक्री वार्षिक ५ टक्क्यांनी वाढून सुमारे १.२ लाख युनिट्सवर पोहोचली आहे. तर, किमतीत वाढ झाल्याने घरांची मागणी मागील तिमाहीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी घसरली, असल्याचे ॲनारॉकने म्हटले आहे.

रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकने गुरुवारी चालू एप्रिल-जून तिमाहीतील गृहनिर्माण बाजाराची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एप्रिल-जून २०२४ मध्ये सात प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री अंदाजे १,२०,३४० युनिट्स एवढी झाली असून मागील वर्षी वरील तिमाहीतील १,१५,०९० युनिट्सच्या तुलनेत ५ टक्के अधिक आहे. तथापि, जानेवारी-मार्च तिमाहीच्या १,३०,१७० युनिट्स विक्रीच्या तुलनेत विक्रीत ८ टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज आहे.

ॲनारॉकचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले, मागील तिमाहीत १.३० लाखांहून अधिक युनिट्सची विक्री लक्षशत घेता घरांच्या विक्रीत तिमाहीत घसरण झाली आहे. ही घसरण होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या एका वर्षात मालमत्तेच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी घर घेण्याचे टाळले आहे, असे पुरी यांनी स्पष्ट केले. वार्षिक आधारावर, दिल्ली-एनसीआर, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर), बंगळुरू, पुणे, हैदराबादमध्ये घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे, तर चेन्नई आणि कोलकाता येथे मागणीत घट झाली आहे. तथापि, तिमाही आधारावर, केवळ दिल्ली-एनसीआरमध्ये विक्रीत वाढ झाली आहे तर उर्वरित सहा शहरांमध्ये मागणी कमी आहे.

आकडेवारीनुसार, दिल्ली-एनसीआरमधील घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये १ टक्क्यांनी वाढून १६,५५० युनिट्सवर गेली आहे, जी मागील वर्षीच्या १६,४५० युनिट्सवरून होती. मागील तिमाहीत विक्री १५,६५० युनिट्सवरून ६ टक्क्यांनी वाढली आहे. हैदराबादमधील घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये ११ टक्क्यांनी वाढून १५,०८५ युनिट्सवर पोहोचली आहे, जी मागील वर्षीच्या १३,५६५ युनिट्स होती. मागील तिमाहीतील १९,६६० युनिट्सच्या तुलनेत या तिमाहीत विक्री २३ टक्क्यांनी घसरली आहे. चेन्नईमध्ये एप्रिल-जूनमध्ये घरांची विक्री ९ टक्क्यांनी घसरून ५,०२० युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षीच्या ५४९० युनिट्सवरून होती. यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीतील ५,५१० युनिट्सवरून या तिमाहीत मागणी ९ टक्क्यांनी कमी झाली आहे. कोलकाता येथील घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये २० टक्क्यांनी घसरून ४,६४० युनिट्सवर आली आहे.

मुंबई महानगरात तिमाहीत घरांची विक्री ९ टक्क्यांनी वधारली

एमएमआरमध्ये, एप्रिल-जूनमध्ये घरांची विक्री ९ टक्क्यांनी वाढून ४१,५४० युनिट्सवर गेली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत ३८,०८५ युनिट्स होती. एमएमआरमधील विक्री मागील तिमाहीत ४२,९२० युनिट्सवरून ३ टक्क्यांनी घसरली आहे. बंगळुरूमधील घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये १६,३६० युनिट्सवर होती, जी मागील वर्षीच्या १५,०४५ युनिट्सच्या तुलनेत ९ टक्क्यांनी अधिक होती. परंतु मागील तिमाहीच्या तुलनेत विक्री ८ टक्क्यांनी घसरून १७,७९० युनिट्सची मागणी होती. पुण्यात एप्रिल-जूनमध्ये घरांची विक्री २ टक्क्यांनी वाढून २१,१४५ युनिट्सवर पोहोचली असून मागील वर्षीच्या २०,६८० युनिट्सवर होती. जानेवारी ते मार्च या कालावधीतील २२,९९० युनिट्सवरून या तिमाहीत विक्री ८ टक्क्यांनी घसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in