तुमच्या घरासाठी परफेक्ट AC कसा खरेदी करायचा? कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी?

तुम्ही १ की १.५ टनाचा एसी घ्यावा? 3 स्टार की ५ स्टार रेटींग असणारा एसी घ्यावा? जाणून घेऊया...
AC कसा खरेदी करायचा?
AC कसा खरेदी करायचा? fpj

मुंबई: सध्या उन्हाळा सुरु आहे. उकाड्यामुळं सर्वजण हैराण झाले आहेत. गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण २४ तास फॅन, कूलर सुरु ठेवतो. पण बऱ्याचदा उकाड्यापासून सुटका होत नाही. अशावेळी एसी घेण्याचा विचार अनेकजण करतात. जर तुम्हीही तुमच्या घरासाठी नवा एसी खरेदी करण्याचं नियोजन करत असाल तर आम्ही तुम्हाला परफेक्ट एसी कसा निवडायचा याची माहिती देणार आहोत.

किती क्षमतेचा एसी खरेदी करायचा?

एसी खरेदी करतेवेळी खोलीचं क्षेत्र किती आहे हे लक्षात घ्यायला हवं. १५० चौरस फूट क्षेत्र असणाऱ्या खोलीसाठी १.२ टन एसी योग्य राहील. तर १५० ते २५० चौरस फूट क्षेत्र असलेल्या खोलीसाठी १.५ टन एसी उत्तम राहू शकतो. २५० ते ४०० चौरस फूट क्षेत्रासाठी २ टनचा एसी योग्य ठरू शकतो.

इथं टनचा अर्थ कुलींग कॅपेसिटी अर्थात थंड करण्याची क्षमता असा आहे. म्हणजेच जितके एसी जितक्या जास्त टन, तितका थंडावा जास्त...

३ स्टार की ५ स्टार एसी खरेदी करावा?

ही झाली एसीच्या क्षमतेची गोष्ट आता पाहूया तुम्हाला किती स्टार एसी खरेदी करायला हवं. मार्केटमध्ये ३ स्टार आणि ५ स्टार एसी उपलब्ध आहेत. वीजेचं बिल कमी हवं असेल, तर ५ स्टार एसी लावायला हवा. तुमचं बजेट कमी असेल, तर तुम्ही ३ स्टार एसी लावू शकता. ५ स्टार एसीची किंमत ३ स्टार एसीच्या तुलनेत ८ ते १० हजार रुपये महाग असते.

विंडो एसी की स्पीट एसी?

जर तुमच्या खोलीला खिडकी असेल, तर तुम्ही विंडो एसी लावू शकता अन्यथा तुम्हाला स्प्लीट एसी लावावा लागेल. जर रुम छोटा असेल तरीही तुम्ही विंडो एसी वापरू शकता. याशिवाय विंडो एसी स्प्लीट एसीच्या तुलनेत स्वस्त असतो. शिवाय विंडो एसीचा आवाज तुलनेनं जास्त येतो.

logo
marathi.freepressjournal.in