देशात हिरो, विदेशात झिरो! भारताच्या नंबर वन SUVला परदेशात मिळाला फक्त १ ग्राहक, विक्रीत ९९ टक्क्यांपेक्षा जास्त घट

२०२४ मध्ये लॉन्च झालेल्या ह्युंडाई क्रेटा फेसलिफ्टला आत्तापर्यंत एक लाख युनिट्सपेक्षा जास्त बुकींग मिळाली आहेत. परंतु ...
ह्युंडाई क्रेटा
ह्युंडाई क्रेटाह्युंडाई

मुंबई: भारतीय ग्राहकांमध्ये सर्वात लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक म्हणजे ह्युंडाई क्रेटा (Hyndai Creta). क्रेटा ही ह्युंडाई कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी कार तर आहेच, शिवाय देशात सर्वाधिक विक्री होणारी मिड-साईज एसयूव्हीसुद्धा आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२४ मध्ये ह्युंडाई क्रेटाच्या १५०००हून अधिक युनिट्सची विक्री झाली होती. भारतात आत्तापर्यंत ह्युंडाई क्रेटाच्या दहा लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. यावरूनच या क्रेटाच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

फक्त एक युनिट एक्सपोर्ट-

दुसरीकडे, २०२४ मध्ये लॉन्च झालेल्या ह्युंडाई क्रेटा फेसलिफ्टला आत्तापर्यंत एक लाख युनिट्सपेक्षा जास्त बुकींग मिळाली आहेत. परंतु निर्यातीच्या बाबतीत मात्र ह्युंडाई क्रेटा यशस्वी होऊ शकली नाही. एप्रिल २०२४ मध्ये ह्युंडाई क्रेटाला परदेशात फक्त एक ग्राहक मिळाला. गेल्या वर्षभरापूर्वी म्हणजेच एप्रिल २०२३ मध्ये ह्युंडाई क्रेटानं ५१३ युनिटची विक्री केली होती. यादरम्यान ह्युंडाई क्रेटाच्या विक्रीत ९९.८१ टक्कांची घसरण दिसली.

ह्युंडाई क्रेटाचं पॉवरफुल इंजिन-

ह्युंडाई क्रेटामध्ये ग्राहकांना ३ इंजिन ऑप्शन मिळतात. कारमध्ये ११५पीएसची पावर आणि १४४एनएम चा पीक टॉर्क जनरेट करणारं १.५ लीटर MPi पेट्रोल इंजिन दिलं गेलंय. याशिवाय कारमध्ये १.५ लीटर टर्बो GDI पेट्रोल इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन १६०पीएसची पॉवर आणि २५३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. तसेच १.५ लीटर U2 CRDi डिझेल इंजिनही उपलब्ध आहे. हे इंजिन ११६ पीएस पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करतं.

७० पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स-

क्रेटा २०२४ फेसलिफ्टच्या इंटीरियरमध्ये एक नवा डॅशबोर्ड, १०.२५ इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि त्याच आकाराचं डिजिटल क्लस्टर देण्यात आलं आहे. याशिवाय पॅनरामिक सनरुफ आणि व्हेंटीलेटेड सीट्ससुद्धा देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी सेफ्टी फीचर्ससाठी कारमध्ये ६ एअरबॅग, सर्व चार चाकांना डिस्क ब्रेक, ब्लाइंट-स्पॉट मॉनिटरिंग आणि ADAS टेक्नॉलॉजीसहीत ७० पेक्षा अधिक फीचर्स दिली गेली आहेत. ही कार ६ कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. ह्युंडाई क्रेटाची एक्स शोरूम किंमत ११ लाख रुपयांपासून सुरु होते. तिच्या टॉप मॉडेलची किंमत २१ लाख रुपयांपर्यंत जाते.

logo
marathi.freepressjournal.in