फक्त 6 लाख रुपये किंमत अन् सनरूफसह भन्नाट फीचर्स; छोट्या फॅमिलीसाठी 27 Kmpl मायलेज देणारी परफेक्ट मायक्रो SUV

तुम्हीही जर स्वस्त आणि उत्तम मायलेज देणारी कार शोधत असाल तर ह्युंडाईची 'ही' कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
फक्त 6 लाख रुपये किंमत अन् सनरूफसह भन्नाट फीचर्स; छोट्या फॅमिलीसाठी 27 Kmpl मायलेज देणारी परफेक्ट मायक्रो SUV

भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट SUV ची मागणी सातत्यानं वाढत आहे. बहुतेक लोक आपल्या कुटुंबासाठी अशा कारच्या शोधात असतात, जी स्वस्त असावी, शिवाय तिचं मायलेजदेखील चांगलं असावं. तुम्हीही अशाच कारच्या शोधात असाल, तर या सेगमेंटमध्ये नवीन ह्युंडाई एक्टर (Hyundai Exter) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही कार टाटा पंचशी स्पर्धा करते. ही कार केवळ चांगलं मायलेजच देत नाही, तर ड्रायव्हिंगचाही उत्तम अनुभवही देते.

ह्युंडाई एक्सटरचं पॉवरफुल इंजिन:

ह्युंडाईची ही मायक्रो एसयूव्ही दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. या कारमध्ये 1.2-लिटर, 4-सिलेंडर (पेट्रोल) इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 81.8 bhp पॉवर आणि 113.8 Nm पीक टॉर्क निर्माण करते. तर CNG मोडमध्ये ती 67.7 bhp वर जास्तीत जास्त 95.2 Nm टॉर्क निर्माण करते.

पेट्रोल व्हेरियंटमध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. तर CNG व्हर्जनमध्ये मॅन्युअल (5 स्पीड) गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. ह्युंडाई एक्स्टरचे पेट्रोल व्हेरियंट 19.2 किमी/लिटर मायलेज देते. तर CNG व्हेरियंट 27.1km/kg मायलेज देते.

ह्युंडाई एक्सटरची केबिन देखील खूप आलिशान आहे. लेग स्पेसही भरपूर आहे. त्यामुळं ही कार लांबच्या प्रवासात सुखद अनुभव देते. या कारची किंमत 6 लाख ते 10.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

ह्युंडाई एक्सटरची आकर्षक डिझाईन अन् फीचर्स:

या कारची डिझाईन आणि फीचर्स Grand i10 Nios हॅचबॅक आणि Aura sedan सारखी आढळतात. मात्र, या एसयूव्हीचा एक्सटेरियर लूक अतिशय आकर्षक डिझाइनमध्ये तयार करण्यात आला आहे.

नवीन स्प्लिट हेडलाइट सेटअप आणि पॅरामेट्रिक ग्रिल्ससह तिचे फ्रंट एंड खूपच सुंदर दिसते. या मायक्रो एसयूव्हीला15 इंच डायमंड कट अलॉय व्हील देण्यात आली आहेत. याशिवाय शार्क फिन अँटेना आणि बॉडी क्लॅडिंगमुळे तिची रचना अधिक आकर्षक बनते.

कारची मागील रचना देखील उत्तम आहे. टेललाइट्ससह ह्युंदाई बॅज देण्यात आले आहेत. याशिवाय, सिल्व्हर रंगाची स्किड प्लेट आणि काळ्या रंगाचे छतावर बसवलेले स्पॉयलर असलेले सनरूफ उठून दिसतं.

सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, एक्टरमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSM), हिल होल्ड असिस्ट आणि सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in