राष्ट्रीय सुरक्षेला धोका! बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंग, जुगार हे दहशतवाद्यांच्या अर्थसहाय्याचे स्रोत

ऑनलाईन बेटिंग आणि जुगार खेळणाऱ्या बेकायदेशीर कंपन्या हे मनीलाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना अर्थसहाय्य करणारे प्रमुख मार्ग असल्याचे राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या सुरक्षा आणि विज्ञान तंत्रज्ञान संशोधन संघटनेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला धोका! बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंग, जुगार हे दहशतवाद्यांच्या अर्थसहाय्याचे स्रोत
Published on

नवी दिल्ली : ऑनलाईन बेटिंग आणि जुगार खेळणाऱ्या बेकायदेशीर कंपन्या हे मनीलाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना अर्थसहाय्य करणारे प्रमुख मार्ग असल्याचे राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या सुरक्षा आणि विज्ञान तंत्रज्ञान संशोधन संघटनेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही मोठा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मान्यताप्राप्त ऑनलाईन रिअल गेमिंग व बेकायदेशीर बेटिंग आणि जुगार यामध्ये ‘माहिती-तंत्रज्ञान २०२१’ नियमात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील कायद्याचे पालन करून कायदेशीर ऑनलाईन रिअल मनी गेमिंग व्यासपीठाची नोंदणी करणारी यंत्रणा गरजेची असल्याची सूचना अहवालामध्ये करण्यात आली आहे.

बेकायदेशीर ऑनलाईन जुगार आणि बेटिंग ॲप्लिकेशन्समुळे भारतीय डिजिटल नागरिकांसमोर सायबर सुरक्षा हल्ल्यासारखे धोके निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग आणि जुगार संकेतस्थळे मनीलाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणारे स्रोत म्हणून काम करीत असल्याने राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे.

बेटिंग व जुगार बाजारपेठेत १० लाख कोटींची उलाढाल

भारतातील बेटिंग आणि जुगार बाजारपेठेत किती उलाढाल होते त्याचा अधिकृत अंदाज नाही, मात्र ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर स्पोर्ट्स सिक्युरिटीच्या २०१७’च्या अहवालानुसार, या बाजारपेठेत जवळपास १० लाख कोटी रुपयांची (१५० अब्ज डॉलर) उलाढाल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in