जूनमध्ये पीएमआय वाढला; विक्रमी निर्यात ऑर्डरचा फायदा; ६१.० वर पोहोचला
नवी दिल्ली : जूनमध्ये भारतातील खासगी क्षेत्रातील व्यवहारांमध्ये जोरदार वाढ होत असल्याने कारण एचएसबीसी फ्लॅश कंपोझिट परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स मे महिन्यातील ५९.३ वरून जूनमध्ये १४ महिन्यांच्या उच्चांकी ६१.० वर पोहोचला आहे. नवीन निर्यात ऑर्डरमध्ये विक्रमी वाढ झाल्यामुळे भारतीय कंपन्यांनी त्यांचे उत्पादन वाढवले आहे, असे एस अँड पी ग्लोबलने सोमवारी सांगितले.
नवीन निर्यात ऑर्डर खासगी क्षेत्रातील व्यवसाय उलाढालींना- विशेषतः उत्पादन क्षेत्रात, चालना देत राहिले, असे एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या. दरम्यान, जागतिक स्तरावरील मागणी आणि उत्पादन वाढीसाठी उत्पादकांना नोकर भरती करण्यास प्रवृत्त केले, असे भंडारी म्हणाल्या.
सेवा क्षेत्रासाठी ही वाढ जास्त असून मे महिन्यात ५८.८ वरून ६०.७ वर पोहोचला, तर उत्पादन निर्देशांक मे महिन्यात ५७.६ वरून ५८.४ वर पोहोचला. ५० पेक्षा जास्त पीएमआय मागील महिन्यातील व्यवहारांमध्ये वाढ दर्शवते, तर त्याखालील आकुंचन दर्शवते. जूनसाठी अंतिम पीएमआय आकडे जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातील.
सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीचे दर अनुक्रमे १० महिन्यांच्या आणि दोन महिन्यांच्या उच्चांकावर होते. पॅनेलच्या सदस्यांच्या मते, अनुकूल मागणी कल, कार्यक्षमता वाढ आणि तंत्रज्ञान गुंतवणूकीमुळे उत्पादन वाढले.
एस अँड पी ग्लोबलच्या मते, सप्टेंबर २०१४ मध्ये मालिका सुरू झाल्यापासून जूनमध्ये नवीन निर्यात ऑर्डर सर्वात वेगाने वाढल्या. जगभरातील कंपन्यांना जास्त ऑर्डर मिळाल्या. कंपन्यांनी आशिया, युरोप, मध्य पूर्व आणि अमेरिकेतून मजबूत मागणी नोंदवली, असे त्यात म्हटले आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पीएमआय आकडेवारीसाठी प्रतिसाद गोळा केले जातात, ज्यामध्ये एकूण प्रतिसादांच्या ८०-९० टक्के निर्देशांक मोजले जातात.
उत्पादनवाढीसाठी नोकरभरतीत वाढ
जूनच्या डेटामध्ये भारतीय कंपन्यांमधील क्षमतेच्या दबावाची तीव्रता देखील दिसून येते. मागणीची ताकद आणि उत्पादनवाढीसाठी भारतीय कंपन्यांना जूनमध्ये अतिरिक्त कर्मचारी भरती करण्यास प्रवृत्त केले, असे एस अँड पीने म्हटले आहे. उत्पादन उद्योगात रोजगार वाढीने उच्चांक गाठले, तर सेवा प्रदात्यांनी मे महिन्याच्या तुलनेत रोजगार निर्मितीमध्ये मंद गतीने वाढ दर्शविली, असे त्यात म्हटले आहे. जूनमध्ये, खासगी क्षेत्रातही कामगार आणि धातूच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन किमतींमध्ये माफक वाढ दिसून आली. गुणात्मक आकडेवारीवरून असे दिसून आले की, काही कंपन्यांनी जास्त खर्चाच्या प्रतिसादात त्यांचे शुल्क वाढवले, तर काहींनी नवीन व्यवसाय सुरक्षित करण्यासाठी असे करणे टाळले, असे अहवालात म्हटले आहे.