भारताचे 4G तंत्रज्ञान २०२५ च्या मध्यापर्यंत आणणार : सिंधिया

भारताचा स्वतःचा 4G तंत्रज्ञान ‘स्टॅक’ २०२५ च्या मध्यापर्यंत आणला जाईल, असे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी बुधवारी सांगितले. त्यांनी देश आणि सरकारसाठी तीन प्रमुख लक्ष्य सांगितले.
भारताचे 4G तंत्रज्ञान २०२५ च्या मध्यापर्यंत आणणार : सिंधिया
Published on

नवी दिल्ली : भारताचा स्वतःचा 4G तंत्रज्ञान ‘स्टॅक’ २०२५ च्या मध्यापर्यंत आणला जाईल, असे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी बुधवारी सांगितले. त्यांनी देश आणि सरकारसाठी तीन प्रमुख लक्ष्य सांगितले.

सिंधिया येथे ‘एआयएमए राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनाच्या ५१व्या आवृत्तीत मुख्य भाषण देत होते. भारताने प्रथमच, तिचा स्वतःचा 4G तंत्रज्ञान ‘स्टॅक’ विकसित केला आहे जो पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत आणला जाईल. केवळ तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणेच नव्हे तर स्वदेशी तंत्रज्ञानाची रचना आणि विकास करणे देखील महत्त्वाचे आहे, असे सिंधिया पुढे म्हणाले.

आम्ही स्वतःसाठी तीन लक्ष्ये ठेवली आहेत. पहिले लक्ष्य म्हणजे आपल्या देशाचा प्रत्येक कोपरा डिजिटल पद्धतीने जोडला गेला पाहिजे. डिजिटल क्रांतीद्वारे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक संधीचा लाभ घेता आला पाहिजे. भारताने देशभरात जवळपास साडेचार लाख टॉवर उभारले आहेत. सरकारने आणखी २० हजार टॉवर उभारण्याचे ठरवले असून या उपक्रमासाठी ४४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष २५ च्या मध्यापर्यंत आम्ही आमच्या देशात १०० टक्के सेवा देण्याचे आश्वासन पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले.

दुसरे लक्ष्य म्हणजे ‘मेक इन इंडिया’वर भर आहे आणि तेच परिवर्तन दूरसंचार उपकरणांच्या क्षेत्रात व्हायला हवे. तिसरे ध्येय म्हणजे भारतात भविष्यासाठी तयार तंत्रज्ञान आहे याची खात्री करणे, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. परंतु नवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीच्या आमच्या स्वतःच्या क्षमतांचा वापर करणे देखील आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

पोस्ट ऑफिस कायदा आणि नवीन दूरसंचार कायद्याबद्दल बोलले आणि परिवर्तनशील वाढीचे आश्वासन त्यांनी दिले. “मी तुम्हा सर्वांना वचन देतो की आमच्या क्षेत्रातील नवीन प्रतिमान बदल सक्षम करण्यासाठी या वर्षी डिसेंबरपर्यंत दोन्ही विभागांद्वारे एक अतिशय पारदर्शक, दूरदर्शी नियम यंत्रणा जाहीर केली जाईल.”

logo
marathi.freepressjournal.in