भारत-ब्रिटनमध्ये होणार मुक्त व्यापार; दोन्ही देशांनी केली घोषणा

भारत आणि ब्रिटनमध्ये बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करार झाला आहे. या करारानंतर दोन्ही देशांनी याबाबतची घोषणा केली.
भारत-ब्रिटनमध्ये होणार मुक्त व्यापार; दोन्ही देशांनी केली घोषणा
Published on

नवी दिल्ली : भारत आणि ब्रिटनमध्ये बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करार झाला आहे. या करारानंतर दोन्ही देशांनी याबाबतची घोषणा केली.

या व्यापार करारानुसार, जास्तीत वस्तू व सेवांवरील टॅरिफ हटवण्याची तरतूद केली आहे. या करारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून हा ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचे सांगितले. यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील. भारत व ब्रिटनने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही देशातील अर्थव्यवस्थामध्ये व्यापार, गुंतवणूक, विकास, रोजगारात वाढ होणार आहे.

बोरिस जॉन्सन यांच्या काळापासून प्रयत्न ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस

जॉन्सन यांच्या काळापासून मुक्त व्यापार करारासाठी भारत व ब्रिटन प्रयत्नशील होते. या काळात अनेक गुंतागुंतीच्या मुद्द्यावर काम करण्याचे प्रयत्न अधिकाऱ्यांनी केले. भारतीयांसाठी व्हिसा, कार व स्कॉच व्हिस्की आदी ब्रिटनच्या निर्यातीवर टॅरिफ व ब्रिटनमधील कार्बन बॉर्डर ॲॅडजेस्टमेंट मॅकेनिझम, कार्बन वस्तू आदींचा समावेश होता.

भारत टॅरिफ कमी करणार

भारत ब्रिटनमधून ९० टक्के आयातीवर टॅरिफवर कपात करणार आहे. त्यातील ८५ टक्के वस्तू येत्या १० वर्षात टॅरिफमुक्त होतील.भारत व्हिस्की व जीनवरील टॅरिफ ७५ टक्के करणार आहे. तसेच वाहन टॅरिफ १० टक्के करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in