भारताला तात्पुरता दिलासा; ९२ देशांवर ७ ऑगस्टपासून ‘टॅरिफ’ लागू

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह ९० देशांवर एक ऑगस्टपासून लादलेले ‘टॅरिफ’ सात दिवसांसाठी पुढे ढकलले आहे. हे टॅरिफ आता ७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. भारतावर अमेरिकेने २५ टक्के ‘टॅरिफ’ लागू केले आहे, तर चीनचा या यादीत समावेश केलेला नाही.
भारताला तात्पुरता दिलासा; ९२ देशांवर ७ ऑगस्टपासून ‘टॅरिफ’ लागू
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह ९० देशांवर एक ऑगस्टपासून लादलेले ‘टॅरिफ’ सात दिवसांसाठी पुढे ढकलले आहे. हे टॅरिफ आता ७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. भारतावर अमेरिकेने २५ टक्के ‘टॅरिफ’ लागू केले आहे, तर चीनचा या यादीत समावेश केलेला नाही.

ट्रम्प यांनी नवीन ‘टॅरिफ’ लागू करण्यात येत असलेल्या ९२ देशांची यादी शुक्रवारी जाहीर केली. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के, तर पाकवर १९ टक्के टॅरिफ लावले आहे. कॅनडावर तत्काळ ३५ टक्के टॅरिफ लागू केले आहे.

दक्षिण आशियात सर्वात कमी ‘टॅरिफ’ पाकवर लावला आहे. यापूर्वी पाकवर २९ टक्के ‘टॅरिफ’ लावला होता. सर्वात जास्त ४१ टक्के ‘टॅरिफ’ सीरियावर लावण्यात आला आहे. ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी जगातील बहुतांश देशांवर ‘टॅरिफ’ लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी हा निर्णय ९० दिवस पुढे ढकलला. या ९० दिवसांत ९० देशांशी करार करण्याचे लक्ष्य ट्रम्प सरकारने ठेवले होते. आतापर्यंत ७ देशांशीच अमेरिकेचा करार झाला आहे. लाओस, म्यानमार, सीरियावर ४० टक्क्यांपेक्षा अधिक ‘टॅरिफ’, युरोपियन संघाच्या वस्तूंवर सध्या १० टक्के ‘टॅरिफ’ असल्यास त्यावर ५ टक्के अतिरिक्त कर लावले जाईल. चीनवर यापूर्वीच मेमध्ये ३० टक्के ‘टॅरिफ’ लागू आहे.

भारतावर ‘टॅरिफ’ लावल्याने रशिया संतप्त

भारतावर अमेरिकेने ‘टॅरिफ’ लावल्याने रशिया संतापला आहे. भारतासोबत आर्थिक संबंध अधिक चांगले करण्यावर रशियाकडून भर दिला जात आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये चलन यंत्रणा तयार करण्यासाठी चर्चा सुरू आहे, असे भारतातील रशियाचे राजदूत डेनिल अलीपोव यांनी सांगितले.

शेतकरी, व्यापाऱ्यांच्या हिताचे पूर्ण रक्षण करणार

देशातील शेतकरी, व्यापारी, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योग व औद्याेगिक क्षेत्राच्या हिताचे संपूर्णत: संरक्षण केले जाईल, अशी भूमिका परराष्ट्र खात्याने शुक्रवारी जाहीर केली.

logo
marathi.freepressjournal.in