नोव्हेंबर अखेरीस व्यापार करार शक्यता; नीती आयोगाचे CEO यांना विश्वास

भारताच्या अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराबद्दल (बीटीए) काही सकारात्मक बातम्या नोव्हेंबर अखेरीस येतील, असा विश्वास नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी शुक्रवारी विश्वास व्यक्त केला.
नोव्हेंबर अखेरीस व्यापार करार शक्यता; नीती आयोगाचे CEO यांना विश्वास
नोव्हेंबर अखेरीस व्यापार करार शक्यता; नीती आयोगाचे CEO यांना विश्वास
Published on

नवी दिल्ली : भारताच्या अमेरिकेसोबतच्या प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराबद्दल (बीटीए) काही सकारात्मक बातम्या नोव्हेंबर अखेरीस येतील, असा विश्वास नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी शुक्रवारी विश्वास व्यक्त केला.

'सीएनबीसी-टीव्ही१८' च्या समिट ग्लोबल लीडरशिप २०२५- दुसऱ्या आवृत्तीमध्ये बोलताना सुब्रह्मण्यम यांनी असेही सांगितले की, नोव्हेंबर अखेरीस राष्ट्रीय उत्पादन अभियान सुरू होईल.

मला वाटते की, अमेरिकेसोबत गोष्टी थोड्या कठीण झाल्या आहेत आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यापार वाटाघाटी सुरू आहेत... आशा आहे की, महिन्याच्या अखेरीस, आपल्याला त्या आघाडीवर काही बातम्या ऐकायला मिळतील, असे ते म्हणाले. सीईओंनी नमूद केले की नवी दिल्ली परदेशी गुंतवणूकदारांचा एक स्थिर प्रवाह आकर्षित करत आहे. अमेरिकन कंपन्यांना भारतात जागतिक क्षमता केंद्रे उघडायला लावली आहेत. म्हणून याचा अर्थ असा की भारताचे मूलभूत आकर्षण इतर सर्व गोष्टींवर मात करेल.

रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव आणत असल्याने त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व आहे. अमेरिकेने २२ ऑक्टोबर रोजी रशियाच्या दोन सर्वात मोठ्या कच्चे तेल उत्पादक कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले, ज्यामुळे सर्व अमेरिकन संस्था आणि व्यक्तींना त्यांच्यासोबत व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in