भारत-अमेरिका व्यापार चर्चा सकारात्मक

भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारावर झालेल्या दिवसभराच्या चर्चेला सकारात्मक दिशा मिळाली असून, दोन्ही बाजूंनी या कराराचा लवकर व परस्पर हिताचा निष्कर्ष काढण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी दिली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारावर झालेल्या दिवसभराच्या चर्चेला सकारात्मक दिशा मिळाली असून, दोन्ही बाजूंनी या कराराचा लवकर व परस्पर हिताचा निष्कर्ष काढण्यासाठी प्रयत्न तीव्र करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. अमेरिकेतर्फे मुख्य संवादक ब्रेंडन लिंच आणि भारतातर्फे वाणिज्य अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी या चर्चेत सहभाग घेतला. मंगळवारी झालेल्या बैठकीत विविध पैलूंवर सकारात्मक चर्चा झाली.

परस्परांना लाभदायक ठरणाऱ्या व्यापार कराराचा लवकर निष्कर्ष निघण्यासाठी अधिक वेगाने प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला," असे मंत्रालयाने अमेरिकन अधिकाऱ्यांबरोबर दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in