
बंगळुरू : दीर्घकालीन वाढीच्या धोरणांवरील वाढता भर, स्त्री गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग आणि छोट्या शहरांमध्ये स्वीकृतीची लाट हे बदल आभासी अर्थात क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीतून घडल्याचे निरिक्षण नोंदविणारा अहवाल नुकताच जारी करण्यात आला.
अर्ध्याहून अधिक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत आता बिटकॉइन व ऑल्टकॉइन असल्यामुळे आता भारतीय क्रिप्टो व्यापारी प्रगल्भ होत आहेत, ॲसेट वितरणाच्या बाबतीत अधिक धोरणी होत आहेत आणि डिजिटल ॲसेटमधील रूपांतरणात्मक संभाव्यता स्वीकारत आहेत हे कॉइनडीसीएक्सच्या नव्या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
कॉइनडीसीएक्स या भारतातील सर्वांत मोठ्या क्रिप्टो एक्स्चेंजने २०२४ सालातील वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
भारतातील क्रिप्टो बाजारपेठांतील गतीशील उत्क्रांतीवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. गुंतवणूकदारांच्या वर्तनात लक्षणीय बदल होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
२०२५ मध्ये अमेरिकास्थित क्रिप्टो व वेबथ्री फर्म्सच्या आयपीओंची लाट येणे अपेक्षित आहे. त्यामुळे पारदर्शकतेत वाढ होऊन तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांना आकर्षित करून घेऊन या क्षेत्राला नव्याने आकार देण्यात साहाय्य होणार आहे. २०००च्या दशकाच्या सुरुवातीला आयपीओंची लाट आली होती तशीच ही लाटही लक्षणीय भांडवलाचा ओघ निर्माण करेल आणि क्रिप्टोला मुख्य प्रवाहातील मालमत्ता वर्ग म्हणून प्रस्थापित करेल, अशी शक्यता आहे. गुंतवणुकीच्या या ओघामुळे गुंतवणूकदारांचा या विभागातील आत्मविश्वास वाढेल. शिवाय गुंतवणूकदारांना क्षेत्राची आर्थिक स्थिती, वाढीची संभाव्यता व दीर्घकालीन व्यवहार्यता यांबद्दलही अधिक स्पष्ट माहिती मिळू शकेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.ॉ
वर्षाच्या अखेरीस अनोखे निरीक्षण समोर आले आहे. गुंतवणूकदारांची प्रगल्भता आणि उद्योगक्षेत्राचीही प्रगल्भता याबाबतचे ते आहे. आकडेवारीतून क्रिप्टो बाजारपेठेची स्थिती दिसून येते. शिवाय दीर्घकालीन वाढीसाठी समतोल पोर्टफोलिओ विकसित करणाऱ्या गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वासही दिसून येतो. यामुळे डिजिटल असेट व जागतिक अर्थकारणास आकार देण्यातील त्यांची भूमिका यांवरील विश्वासाला पाठबळ मिळत आहे. भविष्यकाळाचा विचार करता या रूपांतरणात्मक युगातून मार्ग काढण्यासाठी संरक्षित व सहज उपलब्ध होण्याजोग्या साधनांच्या माध्यमातून वापरकर्त्याला सक्षम करण्यासाठी कॉइनडीसीएक्स कायम बांधील असेल.
- सुमित गुप्ता, कॉइनडीसीएक्सचे सहसंस्थापक