भारताची विदेशी गंगाजळी घसरून ६४४ अब्ज डॉलरवर

देशातील विदेशी गंगाजळी २० डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात आणखी ८.४७८ अब्ज डॉलरने घसरून ६४४.३९१ अब्ज डॉलरवर आली आहे, असे आरबीआयने शुक्रवारी सांगितले.
भारताची विदेशी गंगाजळी घसरून ६४४ अब्ज डॉलरवर
Published on

मुंबई : देशातील विदेशी गंगाजळी २० डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात आणखी ८.४७८ अब्ज डॉलरने घसरून ६४४.३९१ अब्ज डॉलरवर आली आहे, असे आरबीआयने शुक्रवारी सांगितले. मागील अहवाल आठवड्यात, गंगाजळी १.९८८ अब्ज डॉलरने घसरून ६५२.८६९ अब्ज डॉलरवर येत या सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती.

गेल्या काही आठवड्यांपासून गंगाजळीत घट होत आहे आणि रुपयातील अस्थिरता कमी करण्यासाठी आरबीआयने केलेल्या विदेशी चलन बाजारातील हस्तक्षेपासह पुनर्मूल्यांकनामुळे ही घसरण झाली आहे. विदेशी गंगाजळी सप्टेंबरच्या अखेरीस ७०४.८८५ अब्ज डॉलर इतक्या उच्चांकावर पोहोचली होती.

गंगाजळीचा एक प्रमुख घटकपरकीय चलन संपत्ती २० डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ६.०१४ अब्ज डॉलरने घटून ५५६.५६२ अब्ज अमेरिकन डॉलर झाली, असे शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून दिसून आले.

आठवडाभरात सोन्याचा साठा २.३३ अब्ज डॉलरने कमी होऊन ६५.७२६ अब्ज डॉलर झाला, असे आरबीआयने सांगितले. तर स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDRs) ११२ दशलक्ष डॉलरने कमी होऊन १७.८८५ अब्ज डॉलर झाले आहेत, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. तर आयएमएफमधील भारताची राखीव स्थिती देखील अहवालाच्या आठवड्यात २३ दशलक्ष अमेरिकन डॉलरने घसरून ४.२१७ अब्ज डॉलर झाली आहे, केंद्रीय बँकेच्या आकडेवारीनुसार दिसून येते.

logo
marathi.freepressjournal.in