शेअर बाजारात तुमचेही पैसे बुडाले? 'या' ९ सरकारी योजनांमध्ये गुंतवा पैसे, व्हाल मालामाल...

Investment in Government Schemes : लोकसभा निवडणूकीच्या निकालादिवशी म्हणजेच 4 जून रोजी शेअर बाजारात आलेल्या त्सुनामीमुळे गुंतवणूकदारांचं एकाच दिवसात सुमारे 45 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. असंच तुमचंही नुकसान होऊ नये, असं वाटत असेल तर तुम्ही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
investment in government scheme
investment in government schemefpj
Published on

मुंबई: लोकसभा निवडणूकीच्या निकालादिवशी म्हणजेच 4 जून रोजी शेअर बाजारात आलेल्या त्सुनामीमुळे गुंतवणूकदारांचं एकाच दिवसात सुमारे 45 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. कोविड महामारीनंतर 4 वर्षांतील ही सर्वात मोठी घट होती. काल शेअर बाजारात कित्येक गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही जोखीम न घेता गुंतवणूक करायची असेल, तर सरकारी योजना तुमच्यासाठी अधिक चांगल्या ठरतील.

सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवताना कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. याशिवाय टॅक्स बेनिफिट्स आणि इतर गोष्टींचाही लाभ मिळतो. याशिवाय जास्त परताव्याचा लाभही दिला जातो. आज आपण 9 सरकारी योजना आणि त्यांचा परतावा तसेच इतर लाभांबद्दल माहिती सांगणार आहोत.

सरकारने 30 जून रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदर कायम ठेवले आहेत. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 1 एप्रिल ते 30 जून 2024 या तिमाहीसाठी, पोस्ट ऑफिस PPF, SCSS, टाइम डिपॉझिट, MIS, NSC, KVP, महिला सेव्हिंग सर्टीफिकेट आणि सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत योजनांच्या व्याजात बदल झालेला नाही.

कोणत्या योजनेत किती व्याज?

PPF मध्ये वार्षिक 7.1% व्याज दिले जाते. यामध्ये तुम्ही 500 ते 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. ही योजना करातून सूट देते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना 8.2% व्याज देते आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये एकरकमी जमा करता येतात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट 3 वर्षांसाठी 7.1% आणि पाच वर्षांसाठी 7.5% व्याज देते. 5 वर्षांची मुदत ठेवीवर करामध्ये सवलत आहे, तसेच यामधील गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्हाला 7.4% परतावा मिळतो. यामध्ये तुम्ही 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. NSC 7.7% कंपाउंडिंग रिटर्न मिळतो. ही स्कीम कर सूटीअंतर्गत येते. किसान विकास पत्रात 7.5 टक्के व्याज दिले जाते. महिला बचत प्रमाणपत्रावर 7.5% व्याज देखील उपलब्ध आहे, ही योजना फक्त 2 वर्षांसाठी आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2% व्याज मिळते.

या योजनांतून मिळवू शकता भरघोस उत्पन्न -

  • तुम्ही पीपीएफ योजनेत दरवर्षी 1.50 लाख रुपये गुंतवल्यास, 7.1% व्याजदराने तुम्ही 25 वर्षांत करोडपती होऊ शकता.

  • SCSS स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ज्यामध्ये ते जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करून 8.2% व्याजदराच्या माध्यमातून लाखो रुपयांचे फायदे मिळवू शकतात.

  • पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट 5 वर्षांसाठी आहे. यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे तितकी जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकता. त्यामुळे करसवलतही मिळते.

  • मंथली इन्कम स्कीममध्ये एकदा पैसे गुंतवून तुम्ही दरमहा ठराविक रक्कम कमवू शकता. या वर, तुम्हाला 7.4 टक्के वार्षिक परतावा देखील मिळू शकतो.

  • NSC अंतर्गत 7.7% चक्रवाढ परतावा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही कर सूट देखील मिळवू शकता. यामध्ये तुम्ही पाच वर्षात चांगले उत्पन्न मिळवू शकता.

  • किसान विकास पत्रामध्ये कोणताही कर लाभ नाही, परंतु त्यात तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करून तुम्ही वार्षिक 7.5 टक्के व्याज नफा मिळवू शकता.

  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्रात 2 लाख रुपये गुंतवून 2 वर्षात हजारो रुपयांचा नफा मिळवू शकतात.

  • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत तिच्या गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवता येऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in