ईशा अंबानी कोणती कार वापरतात माहितीये? कार कलेक्शन पाहून व्हाल चकित

Isha Ambani Car Collection : ईशा अंबानीचं कार कलेक्शन पाहून व्हाल चकित, जाणून घेऊया कोणत्या अलिशान कार वापरतात ईशा अंबानी?
ईशा अंबानींचं कार कलेक्शन
ईशा अंबानींचं कार कलेक्शनरोल्स रॉयस

मुंबई: मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांची ओळख आता केवळ मुकेश अंबांनी यांची मुलगी किंवा अंबानी घराण्याच्या वारसदार अशी राहिलेली नाही, तर त्यांच्याकडे आता व्यवसायाच्या क्षेत्रातील उगवता तारा म्हणून पाहिलं जातं. ईशा अंबानी यांच्या आलिशान जीवनाची चर्चा अनेकदा बातम्या आणि सोशल मीडियामध्ये होत राहते.

ईशा अंबानींचं कार कलेक्शन:

ईशा अंबानींकडे विविध कंपनीच्या अलिशान गाड्या आहेत. या कारच्या यादी खूप मोठी आहे. आज आम्ही तुम्हाला ईशा अंबानीच्या कार कलेक्शनबद्दल माहिती देणार आहोत.

मर्सिडीज बेंझ एस-क्लास (Mercedes Benz S-Class): मर्सिडीज बेंझ एस क्लास ही कार अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती आणि खेळाडूंची आवडती कार आहे. तिची किंमत 1.77 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि तिचं टॉप मॉडेल 1.86 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

या कार 3.0-लिटर, सहा-सिलेंडर पेट्रोल किंवा डिझेल इंजिनसह ऑफर केली जाते. तिचे पेट्रोल इंजिन 367 bhp पॉवर आणि 500 ​​Nm टॉर्क निर्माण करते, तर डिझेल इंजिन 330 bhp पॉवर आणि 700 Nm टॉर्क निर्माण करते.

बीएमडब्ल्यू 7 सीरिज (BMW 7-series): ईशाच्या लक्झरी कारच्या यादीत दुसरं नाव BMW 7-सीरीज आहे. या कारची किंमत 1.82 कोटी ते 1.84 कोटी रुपये आहे. मर्सिडीज एस-क्लास प्रमाणे, ही कार देखील 3.0-लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह येते.

पोर्शे केमन एस (Porsche Cayman S): ईशाकडे पोर्शे कंपनीची केमन एस ही आलिशान कार देखील आहे. तिची किंमत 1.48 कोटी रुपये आहे. ही कार ३४३६ सीसी इंजिनसह येते आणि ती डीसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशननेही सुसज्ज आहे.

रोल्स रॉयस (Rolls Royce Cullinan): ही जगातील सर्वात आलिशान आणि महागडी कार आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 6.95 कोटी रुपये आहे. या कारमध्ये 6.75L V12 इंजिन आहे. हे इंजिन563 bhp पॉवर आणि 850 Nm टॉर्क निर्माण करते.

रेसिंग लक्झरी कारचाही समावेश-

ईशा अंबानीकडेही तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणेच आलिशान आणि रेसिंग लक्झरी कारचे कलेक्शन आहे. वर दिलेल्या आलिशान गाड्यांशिवाय ईशा अंबानीकडे इतरही अनेक गाड्या आहेत. या सर्व आलिशान कार्स जगातील सर्वात आलिशान कार आहेत आणि त्या त्यांच्या अप्रतिम डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आरामदायी राइडसाठी ओळखल्या जातात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in