Mukesh Ambani यांची मुलगी लॉन्च करणार देशातील स्वस्त AC? नेमका काय आहे प्लॅन?

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानींच्या Wyzr बँडनं नुकताच एक Air Cooler लॉन्च केला आहे. याशिवाय कंपनी लवकरच इतरही होम अप्लायन्सेस लॉन्च करू शकते.
वायझर एसी
वायझर एसीप्रातिनिधिक फोटो

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सध्या रिलायन्स रिटेलची जबाबदारी सांभाळत आहे. रिलायन्स रिटेल ही भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजची एक महत्त्वाची कंपनी आहे. मुकेश अंबानी यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये रिलायन्स रिटेलची जबाबदारी ईशा अंबानींकडे सोपवली, तेव्हापासून ही कंपनी चांगली कामगिरी करत आहे.

रिलायन्स रिटेलला आपला पोर्टफोलिओ वाढवायचा आहे आणि कंपनी लवकरच गृहोपयोगी वस्तूंच्या नवीन श्रेणीत प्रवेश करणार आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स रिटेल लवकरच स्मार्ट टीव्ही, एसी आणि इतर गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

Wyzr देशातील सर्वात स्वस्त Cooler?

रिलायन्स रिटेलनं अलीकडेच वायझर नावाचा नवीन ब्रँड लॉन्च केला आहे. या ब्रँडनं नुकताच एअर कूलर लॉण्च केला आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या अहवालानुसार, रिलायन्स सध्या स्थानिक फर्म डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि मिर्क इलेक्ट्रॉनिकशी चर्चा करत आहे. या कंपन्यांची पॅरेंट कंपनी ओनिडा आहे. मार्केट शेअरमध्ये चांगल्या प्रकारे वाढ व्हावी यासाठी कंपनी स्वतःचा मॅन्युफॅक्चर प्लांट उभारण्याचा प्रयत्न करत आहे.

Wyzr च्या मदतीनं, ईशा अंबानीची रिलायन्स रिटेल इतर ब्रँडसाठी समस्या निर्माण करू शकते. या ब्रँड अंतर्गत कंपनी टीव्ही, फ्रिज, एसी, एलईडीचे उत्पादन करू शकते.

भारतात एसीची बाजारपेठ खूप मोठी आहे, छोट्या ब्रँडपासून ते अनेक मोठे आणि प्रसिद्ध ब्रँड्स येथे आहेत. यामध्ये O'general, carrier, Samsung, LG आणि Blue Star सारख्या ब्रँडचा समावेश आहे. रिलायन्स एसी भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतरच कंपनीची पुढील रणनीती स्पष्ट होईल.

logo
marathi.freepressjournal.in