जॅकपॉट! TATA कार खरेदीवर बंपर डिस्काउंट, 'या' कारवर सव्वा लाखांपर्यंत सूट, जाणून घ्या डिटेल्स

तुम्ही जर टाटा (Tata) लव्हर असाल आणि टाटाची कार घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण टाटा मोटर्सकडून कंपनीच्या विविध कारवरती भरघोस सूट देत आहे.
टाटा कारवर सवलत
टाटा कारवर सवलतtata

मुंबई: तुम्ही जर टाटा (Tata) लव्हर असाल आणि टाटाची कार घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण टाटा मोटर्सकडून कंपनीच्या विविध कारवरती भरघोस सूट देत आहे. विशेष म्हणजे यामध्ये कंपनीच्या लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉन, हॅरियर आणि सफारीचाही समावेश आहे. याशिवाय, कंपनी पंच, अल्ट्रोज, टियागो आणि टिगोरच्या MY2024 मॉडेल्सवरही चांगली सूट देत आहे.

Tata Nexon : टाटा डीलर्सकडे अजूनही पेट्रोल-मॅन्युअल प्री-फेसलिफ्ट नेक्सॉनचा थोडा स्टॉक आहे. कंपनी या कार्सवर 90,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Nexon च्या डिझेल आणि पेट्रोल-AMT व्हरियंटवर 70,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

याशिवाय, ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान तयार केलेल्या मॉडेल्सवर 45,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. परंतु, Nexon च्या MY2024 मॉडेलवर कोणताही फायदा नाही. Nexon ची सध्या किंमत 8.15 लाख ते 15.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Tata Harrier and Tata Safari : टाटा हॅरियर आणि सफारीच्या प्री-फेसलिफ्ट व्हर्जनवर एकूण 1.25 लाख रुपयांची सूट उपलब्ध आहे. यामध्ये 75,000 रुपयांची रोख सूट आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. ही सवलत ADAS तंत्रज्ञानासह अॅटोमॅटीक व्हेरियंटसाठीही वैध आहे.

तर नॉन ADAS व्हेरियंटवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. हॅरियरची किंमत 15.49 लाख ते 26.44 लाख रुपये आहे, तर सफारीची किंमत 16.19 लाख ते 27.34 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Tata Tiago : कंपनी Tata Tiago च्या पेट्रोल-मॅन्युअल आणि पेट्रोल-AMT व्हेरियंटवर अनुक्रमे 80,000 आणि 70,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. जुन्या सिंगल सिलिंडर Tiago CNG वर 75,000 रुपयांपर्यंत सूट आहे, तर नवीन ट्विन सिलेंडर मॉडेलवर 60,000 रुपयांपर्यंत सूट आहे.

या सवलती MY2023 Tiago साठी उपलब्ध आहेत. भारतीय बाजारपेठेत Tiago ची किंमत 5.65 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.90 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

Tata Punch: सध्या टाटा पंच MY 2023 मॉडेलवर 10,000 रुपयांची रोख सवलत आहे. MY2024 पंच SUV वर कोणत्याही प्रकारची सूट उपलब्ध नाही. पंच कारची किंमत 6.13 लाख रुपये ते 10.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Tata Altroz ​: MY2023 आणि MY2024 Altroz ​​हॅचबॅकवर अनुक्रमे 55,000 आणि 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. भारतात या कारची किंमत 6.65 लाख ते 10.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

Tata Tigor : MY2023 Tigor ला पेट्रोल आणि सिंगल सिलिंडर CNG व्हेरियंटमध्ये एकूण 75,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे, तर ट्विन सिलेंडर Tigor CNG वर 65,000 रुपयांची सूट मिळत आहे. टाटा टिगोरची किंमत 6.30 लाख ते 9.55 लाख रुपये आहे.

logo
marathi.freepressjournal.in