सेबीच्या विरोधात जेन स्ट्रीट लवादाकडे

अमेरिकन ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीटने बुधवारी भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या आदेशाविरोधात सिक्युरिटीज अपील लवादाकडे (एसएटी) धाव घेतली आहे. सेबीने या हेज फंडावर बाजारातील फेरफारांबाबत निर्बंध लादण्याचा आदेश दिला होता.
सेबीच्या विरोधात जेन स्ट्रीट लवादाकडे
Published on

मुंबई: अमेरिकन ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीटने बुधवारी भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या आदेशाविरोधात सिक्युरिटीज अपील लवादाकडे (एसएटी) धाव घेतली आहे. सेबीने या हेज फंडावर बाजारातील फेरफारांबाबत निर्बंध लादण्याचा आदेश दिला होता.

जेन स्ट्रीटने आरोप केला की, स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि कागदपत्रे सेबीने उपलब्ध करून दिली नाहीत. तसेच, सेबीच्या एका विभागाने केलेल्या अलीकडील तपासणीत कोणतीही फेरफार झालेली नाही, असे निष्कर्ष काढले असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे.

सेबीने ३ जुलै रोजी एकतर्फी हंगामी आदेश देत जेन स्ट्रीटच्या चार विभागांना भांडवली बाजारात प्रवेश करण्यास बंदी घातली होती आणि ४८४३ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता.

logo
marathi.freepressjournal.in