जपानी कंपन्या सेमीकंडक्टर युनिट्स स्थापण्यास उत्सुक; डेलॉइटची माहिती

जपानी कंपन्या भारतात सेमीकंडक्टर युनिट्स स्थापन करण्यास उत्सुक असून, या क्षेत्रातील कौशल्य व तज्ज्ञता त्यांच्याकडे असल्याने भारतीय कंपन्यांसोबत भागीदारीसाठी त्या तयार आहेत, असे डेलॉइटने म्हटले आहे.
जपानी कंपन्या सेमीकंडक्टर युनिट्स स्थापण्यास उत्सुक; डेलॉइटची माहिती
Published on

नवी दिल्ली : जपानी कंपन्या भारतात सेमीकंडक्टर युनिट्स स्थापन करण्यास उत्सुक असून, या क्षेत्रातील कौशल्य व तज्ज्ञता त्यांच्याकडे असल्याने भारतीय कंपन्यांसोबत भागीदारीसाठी त्या तयार आहेत, असे डेलॉइटने म्हटले आहे. मात्र, भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारता कुशल मनुष्यबळ, निधी आणि सरकारी पाठिंबा या बाबी महत्त्वाच्या असल्याचे डेलॉइटने नमूद केले आहे. त्यामुळे भारतात सेमीकंडक्टर क्षेत्राच्या वाढीस चालना मिळेल. जपानी कंपन्या भारताबद्दल अत्यंत उत्साही आहेत, असे डेलॉइट एपी आणि एसआरटी लीडर, डेलॉइट जपानचे शिंगो कामाया म्हणाले.

जुलै महिन्यात अमेरिकेनंतर जपान हा दुसरा ‘क्वाड’ भागीदार ठरला, ज्याने भारतासोबत सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या संयुक्त विकासासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीची स्थिरता राखण्यासाठी करार केला. या दोन्ही देशांनी सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन, उपकरण संशोधन, मनुष्यबळ विकास आणि पुरवठा साखळीला स्थिर बनवण्यासाठी सामंजस्य करार केला. सुमारे १०० सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांसह जपान ही सेमीकंडक्टर इकोसिस्टम असलेल्या आघाडीच्या पाच देशांपैकी एक आहे.

बेरी म्हणाले की, देशातील सेमीकंडक्टर क्षेत्र केवळ एका कारखान्याच्या स्थापनेपुरते मर्यादित नाही, तर पूर्ण इकोसिस्टम विकसित करण्यावर भर आहे. आणि जपानमधील किंवा इतरत्र अशा इकोसिस्टम्स स्थापित केलेल्या अनेक जपानी कंपन्या भारतात ते निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. हीच योजना आहे. हीच मोठी कल्पना आहे. हेच गुंतवणूक आणि वचनबद्धता आहे, असे ते म्हणाले.

बेरी यांनी सांगितले की, भारतीय आणि जपानी कंपन्यांमधील योग्य भागीदारी विकसित करणे या क्षेत्राच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. हा एक-दोन वर्षांचा खेळ नाही. हे आमच्यासाठी आणि जपानसाठी अनेक पिढ्यांसाठी फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

भारताचे पुढील दहा वर्षांत १० सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचे उद्दिष्ट

जपानमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत ज्या सेमीकंडक्टर वेफर्स, रसायने व गॅसेस, चिप उत्पादन उपकरणांसाठी वापरल्या जाणाऱ्या लेन्सेस आणि डिस्प्ले तंत्रज्ञानाच्या कच्च्या स्वरूपातील जागतिक नेते आहेत. भारत पुढील दहा वर्षांत १० सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प असावेत, असे उद्दिष्ट ठेवत आहे. तंत्रज्ञान आणि तज्ज्ञता लक्षात घेता, सेमीकंडक्टरसारख्या महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी इकोसिस्टमच्या विकासासाठी जपानसारखा दुसरा चांगला भागीदार असू शकत नाही, असे डेलॉइट इंडियाचे अध्यक्ष - धोरण, जोखीम आणि व्यवहार, रोहित बेरी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in