जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे निधन

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे निधन

मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते.

नरेश गोयल हेही कर्करोगाने आजारी असल्याने त्यांनाही दोन महिन्यांचा हंगामी जामीन देण्यात आला आहे.

गेल्यावर्षी ‘ईडी’ने नरेश गोयल यांना अटक केली होती. त्यांच्यावर ५३८.६२ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. कॅनरा बँकेने ही रक्कम जेट एअरवेजला कर्ज म्हणून दिली होती. नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांना गेल्या नोव्हेंबरमध्ये अटक झाली होती. त्यांचे वय व आजार पाहता विशेष न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in