ऑक्टोबरमध्ये जिओने ३७.६ लाख ग्राहक गमावले; मात्र सक्रिय वापरकर्त्यांमध्ये जिओ आघाडीवर

भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने ऑक्टोबरमध्ये ३७.६ लाख वायरलेस ग्राहक गमावले, परंतु ३८.४७ लाख वापरकर्ते जोडून सक्रिय मोबाईल ग्राहकांची संख्या वाढवली, असे सोमवारी दूरसंचार नियामक ट्रायने जारी केलेल्या मासिक डेटानुसार दिसून येते.
ऑक्टोबरमध्ये जिओने ३७.६ लाख ग्राहक गमावले; मात्र सक्रिय वापरकर्त्यांमध्ये जिओ आघाडीवर
Published on

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने ऑक्टोबरमध्ये ३७.६ लाख वायरलेस ग्राहक गमावले, परंतु ३८.४७ लाख वापरकर्ते जोडून सक्रिय मोबाईल ग्राहकांची संख्या वाढवली, असे सोमवारी दूरसंचार नियामक ट्रायने जारी केलेल्या मासिक डेटानुसार दिसून येते.

एकंदरीत, भारती एअरटेलने महिन्याभरात १९.२८ लाख वापरकर्ते जोडले आणि ऑक्टोबरसाठी तिचे सक्रिय ग्राहक सुमारे २७.२३ लाख होते. तर व्होडाफोन आयडियाने १९.७७ लाख वायरलेस ग्राहक गमावले आणि त्याच्या सक्रिय ग्राहकांची संख्या जवळपास ७.२३ लाख कमी झाली.

एकूणच, रिलायन्स जिओची एकूण वायरलेस ग्राहकांची संख्या ऑक्टोबरमध्ये ४६ कोटींवर घसरली आहे जी सप्टेंबरमध्ये सुमारे ४६.३७ कोटी होती, जरी त्याचा सक्रिय वापरकर्ता आधार मजबूत झाला. तसेच व्होडाफोन आयडियाचा एकूण वायरलेस वापरकर्ते ऑक्टोबरमध्ये २१.०४ कोटींवर आला आहे, जो मागील महिन्यात २१.२४ कोटी होता.

ट्रायच्या क्षेत्रीय आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये एकूण सक्रिय वायरलेस ग्राहकांची संख्या १,०६६.६७ दशलक्ष (१०६.६ कोटी) होती. ट्रायच्या पत्रकानुसार, ऑक्टोबर २०२४ च्या अखेरीस एकूण ब्रॉडबँड ग्राहक ०.३१ टक्क्यांच्या मासिक घट दराने ९४१.४७ दशलक्ष पर्यंत कमी झाले.

logo
marathi.freepressjournal.in