Kia EV3: किआच्या नव्या Electric SUVचा स्टायलिश लुक समोर, जाणून घ्या किंमत
मुंबई: ऑटोमोबाईल कंपनी Kia ने आपल्या आगामी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV, EV3 चा फर्स्ट लुक जारी केला आहे. फोटो प्रसिद्ध होताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये, कारचं डिझाइन खूपच आकर्षक दिसत आहे. कारचे डिझाइन डायनॅमिक असून चौकोनी आकाराचे मडगार्ड आणि मागील बाजूस असलेले बूट हे तिलाआणखी खास बनवतात. EV6 आणि EV9 नंतर, Kia आता स्वस्त आणि शक्तिशाली EV3 आणत आहे. ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही असून तिच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचं बोललं जात आहे.
किती असेल किंमत-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जागतिक बाजारात या कारची किंमत 35000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 29.2 लाख रुपये आहे. मात्र, भारतीय बाजारपेठेत कर आणि कस्टम ड्युटीनंतर या कारची किंमत आणखी वाढू शकते, हेही लक्षात घ्यायला हवं. सध्या कंपनीकडून या कारच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कधी होणार लॉन्च:
Kia 23 मे रोजी EV3 या कारचं जागतिक स्तरावर लॉन्चिंग करणार आहे. पण ती भारतात कधी लॉन्च होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
कंपनीनं ही कार भारतात आणण्याचा निर्णय घेतल्यास, परवडणारी आणि स्टायलिश इलेक्ट्रिक एसयूव्ही शोधणाऱ्यांसाठी हा नक्कीच चांगला पर्याय असेल. तसेच, EV3 च्या येण्यानं, Kia च्या इलेक्ट्रिक वाहनांची श्रेणी देखील वाढेल.