आता स्वस्तात मिळणार Electrics Cars! 'ही' कंपनी देशात लॉन्च करणार अत्याधुनिक कार

Leapmotor भारतात आणणार स्वस्त इलेक्ट्रिक वाहने! नवीन तंत्रज्ञानाने असतील सज्ज
लीपमोटर
लीपमोटर लीपमोटर

मुंबई: भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात एका नव्या कंपनीचं आगमन होणार आहे. चिनी कंपनी लीपमोटर (Leapmotor), स्टेलांटिस ग्रुपच्या (Stellantis Group) सहकार्याने भारतात इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करणार आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते. सर्वसामान्यांना परवडणारी इलेक्ट्रिक वाहने हा या भागीदारीचा उद्देश आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, या दोन कंपन्या मिळून परवडणारी इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा प्रयत्न करणार आहेत जेणेकरून अधिकाधिक लोक ती खरेदी करू शकतील.

Jeep आणि Citroen नंतरचा तिसरा ब्रँड-

Leapmotor हा भारतातील Stellantis Group सोबत हातमिळवणी करणारा Jeep आणि Citroen नंतरचा तिसरा ब्रँड बनेल. चीनी कंपनी लीपमोटर इलेक्ट्रिक वाहनांच्या नवीन तंत्रज्ञानावर काम करते.

स्टेलांटिस ग्रुप या मोठ्या कार उत्पादक कंपनीने चीनमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी लीपमोटरमधील 20% हिस्सा खरेदी केला आहे. यासाठी स्टेलांटिसने 1.5 अब्ज युरोची गुंतवणूक केली आहे. त्यामुळं स्टेलांटिसला लीपमोटरच्या प्रगत इलेक्ट्रिक वाहन निर्मिती तंत्रज्ञानाचा फायदा होईल.

सध्या C11, C01 आणि T03 या तीन मॉडेल्सचा समावेश-

लीपमोटरच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या यादीमध्ये सध्या C11, C01 आणि T03 या तीन मॉडेल्सचा समावेश आहे. या तिन्ही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम वापर करण्यात आला आहे.

T03 ही एक छोटी इलेक्ट्रिक कार आहे. ही कार एका चार्जवर 403 किलोमीटर प्रवास करण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. यात CATL कंपनीची खूप चांगली लिथियम बॅटरी आहे, जिची क्षमता 36.5 kWh आहे. ती अतिशय वेगाने चार्ज करता येते.

T03 फक्त 20 मिनिटांत 30% ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. इतर फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास कारमध्ये दोन स्क्रीन आहेत – एक 8-इंच डॅशबोर्ड स्क्रीन आणि एक मोठा 10.1-इंचाचा HD डिस्प्ले, जो तुम्ही तुमच्या आवाजाने देखील नियंत्रित करू शकता.

दुसरी कार C01 हे इलेक्ट्रिक सेडान आहे, जी एका पूर्ण चार्जमध्ये 717 किलोमीटर प्रवास करू शकते. या कारमध्ये अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) असलेली अतिशय स्मार्ट ड्रायव्हिंग सिस्टीम देखील आहे.

याशिवाय C11 ही इलेक्ट्रिक एसयूव्ही चार मॉडेल्समध्ये येते. ही कार एका पूर्ण चार्जमध्ये 650 किलोमीटरचा प्रवास करू शकते आणि केवळ 3.94 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते.

रिपोर्टनुसार चिनी कंपनी लीपमोटर लवकरच भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करणार आहे. अशा स्थितीत ही वाहने कमी किमतीत उपलब्ध असतील आणि त्यात अत्याधुनिक फीचर्सही असतील. यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ आणखी मजबूत होईल.

logo
marathi.freepressjournal.in