महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

१५ मेपासून या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. बुकिंग सुरू झाल्यापासून अवघ्या 60 मिनिटांत 50,000 हून अधिक कारचे बुकिंग झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) गेल्या महिन्यात नवीन XUV 3XO कॉम्पॅक्ट SUV भारतीय बाजारात लॉन्च केली होती. १५ मेपासून या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. बुकिंग सुरू झाल्यापासून अवघ्या 60 मिनिटांत 50,000 हून अधिक कारचे बुकिंग झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

महिंद्राने आपल्या XUV 3XO चे बुकिंग फक्त 21000 रुपयांमध्ये सुरू केले आहे. बुकिंग सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांत 27000 युनिट्स आणि 60 मिनिटांत म्हणजेच एका तासात 50000 बुकींग मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे. या कारची डिलिव्हरी 26 मे पासून सुरू होईल. आज आम्ही तुम्हाला या कारच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल सांगणार आहोत.

Mahindra XUV3XO व्हेरियंट्स-

ही नवीन एसयूव्ही अद्ययावत डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. कंपनीने MX1, MX2, MX3, MX2 Pro, MX3 Pro, AX5, AX5L, AX7 आणि AX7L प्रकारांमध्ये Mahindra XUV 3XO सादर केला आहे.

Mahindra XUV3XO फीचर्स:

फीचर्सचा विचार करता, XUV 3XO चे केबिन खूप अपडेट केले गेले आहे. 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेलसह असणारा डॅशबोर्ड XUV 400 च्या डॅशबोर्डसारखा दिसतो.

याशिवाय, कारमध्ये नवीन स्टीयरिंग व्हील, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, ॲम्बियंट लाइटिंग, 360-डिग्री सराउंड कॅमेरा, लेदरेट सीट्स, अपडेटेड सेंटर कन्सोल आणि रिअर एसी व्हेंट सारखी वैशिष्ट्ये आहेत.

पॅनोरामिक सनरुप अन् ADAS -

याशिवाय, SUV मध्ये पॅनोरामिक सनरूफ आणि लेव्हल 2ADAS सारख्या सेगमेंट फर्स्ट फीचर्स देखील आहेत. यात 7-स्पीकर हरमन कार्डन साउंड सिस्टम आणि ॲड्रेनोएक्स-कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल देखील आहे.

विशेषत: XUV 3XO मध्ये, ॲड्रेनोएक्स-कनेक्टची(ADRENOX CONNECT) सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये ट्रिप समरी, रिमोट व्हेईकल कंट्रोल, अलेक्सा बिल्ट-इन, व्हेइकल स्टेटस मॉनिटरिंग आणि इन होम अलेक्सा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Mahindra XUV3XO इंजिन:

ही SUV दोन इंजिन पर्यायांसह सादर करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला mStallion G12 TGDi टर्बोचार्ज्ड MPFI इंजिन मिळेल. हे इंजिन 130ps पॉवर आणि 230Nm टॉर्क निर्माण करते.

दुसरं इंजिन D15 VGT इंजिन आहे. हे इंजिन 117 पीएस पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी, यात 6 स्पीड AISiN ऑटोमॅटिक आणि 6 स्पीड ऑटोशिफ्ट प्लस गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

Mahindra XUV3XO ची किंमत-

Mahindra XUV3XO AX5 व्हेरियंटची किंमत 10.69 लाख रुपये, AX5L MT ची किंमत 11.99 लाख रुपये, AX5L AT व्हेरियंटची किंमत 13.49 लाख रुपये, AX7 व्हेरियंटची किंमत 12.49 लाख रुपये आणि AX7L व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे.

logo
marathi.freepressjournal.in