भारतात यूपीआय व खुल्या बँकिंग प्रणालीद्वारे पतपुरवठ्यात मोठे बदल; ७५ टक्के किरकोळ डिजिटल व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून

देशात यूपीआय आणि खुल्या बँकिंग प्रणाली सुरु झाल्यानतंर पतपुरवठ्यात मोठे बदल झाले आहेत. विशेष म्हणजे २०१६ मध्ये एकीकृत देयक मंच म्हणजेच यूपीआयची सुरुवात झाल्यापासून भारतातील आर्थिक व्यवहारांमध्ये बदल झाले आहेत.
भारतात यूपीआय व खुल्या बँकिंग प्रणालीद्वारे पतपुरवठ्यात मोठे बदल; ७५ टक्के किरकोळ डिजिटल व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून
Published on

मुंबई : देशात यूपीआय आणि खुल्या बँकिंग प्रणाली सुरु झाल्यानतंर पतपुरवठ्यात मोठे बदल झाले आहेत. विशेष म्हणजे २०१६ मध्ये एकीकृत देयक मंच म्हणजेच यूपीआयची सुरुवात झाल्यापासून भारतातील आर्थिक व्यवहारांमध्ये बदल झाले असून ३० कोटी नागरिकांना व ५ कोटी व्यावसायिकांना सुरळीत डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी एक मंच उपलब्ध झाला आहे. ऑक्टोबर २०२३ पर्यंत भारतातले ७५ टक्के किरकोळ डिजिटल व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून झाले.

अल्प रकमेचे कर्ज घेणाऱ्यांचे सक्षमीकरण

यूपीआयमुळे नव्या कर्जदारांना, पत कमी असलेल्या कर्जदारांना तसेच कर्ज घेण्यास अक्षम असलेल्या समुदायाला प्रथमच अधिकृतपणे कर्ज मिळवण्याची सोय उपलब्ध झाली. यूपीआयचा सर्वात जास्त उपयोग करणारी क्षेत्रे पुढीलप्रमाणे - नव्याने कर्ज घेणाऱ्यांची संख्या ४ टक्क्यांनी वाढली, कमी पत असलेल्या कर्जदारांची संख्या ८ टक्क्यांनी वाढली

तंत्रवित्त कर्जाची रक्कम २७,७७८ पर्यंत गेली. ही ग्रामीण भागात महिन्याच्या खर्चाच्या रकमेच्या सात पट आहे. तंत्रवित्त कर्ज घेणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढली, त्यांच्या कर्जाच्या रकमेतही ७७ पट वाढ झाली, छोट्या कर्जदारांना कर्ज वितरीत करणाऱ्या पारंपरिक बँकाही कर्ज पुरवठ्याबाबतीत मागे पडल्या. परवडण्याजोग्या डिजिटल तंत्रज्ञानाने यात महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे यूपीआय सेवेचा ग्रामीण आणि शहरी भागातही सारखाच विस्तार झाला. यूपीआयच्या माध्यमातून पतपुरवठ्यात वाढ

यूपीआय व्यवहारांमध्ये झालेल्या १० टक्के वाढीमुळे कर्जांच्या उपलब्धतेत ७ टक्क्यांनी वाढ झाली. त्यातून डिजिटल व्यवहारांच्या माहितीमुळे पतपुरवठा करणाऱ्यांना कर्जदारांचे अधिक चांगले मूल्यांकन करता आले हेच यातून दिसून येते २०१५ ते २०१९ दरम्यान तंत्रवित्त कर्ज घेणाऱ्यांची संख्या बँकेतून कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येइतकीच झाली. यूपीआयचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या भागात वित्ततंत्र कर्ज पुरवठादारांची भरभराट झाली.

प्रवासी वाहन विक्रीत घट

दुसरीकडे, प्रवासी वाहन (पीव्ही) किरकोळ विक्री १३,७२ टक्क्यांनी घसरून ३,२१,९४३ युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षी वरील महिन्यात ३,७३,१४० युनिट्स झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (एफएडीए-फाडा) ने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रवासी वाहन विभागाला लक्षणीय अडचणींचा सामना करावा लागला.

डिसेंबरमध्ये विक्री वाढीची अपेक्षा

एकूण नजीकच्या काळातील दृष्टिकोनाबद्दल फाडाने म्हटले आहे की, डिसेंबरचा नजीकचा दृष्टिकोन सर्व विभागांमध्ये फारसा मजबूत नसला तरी, तो संभाव्य वाढीच्या अपेक्षेने स्थिरतेकडे झुकतो. एकूणच सावधपणे आशावादी राहण्याची भावना अधोरेखित करते. खरीप हंगामाच्या बम्पर हंगामामुळे अन्नधान्य चलनवाढ कमी होण्याची शक्यता असल्याने व्यापक आर्थिक वातावरणात सुधारणा होईल, असे दिसते, जे पुढील महिन्यांत ग्राहकांच्या भावनांना मदत करेल. तथापि, डीलरच्या अभिप्रायावरून प्राप्त झालेला डिसेंबरचा तत्काळ दृष्टिकोन संमिश्र आहे, असेही त्यात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in