MARUTI SUZUKI SPECIAL EDITION
MARUTI SUZUKI SPECIAL EDITIONMARUTI SUZUKI

Maruti Suzukiची 'ड्रीम सीरिज' लॉन्च, फक्त 4.99 लाख रुपयांमध्ये पूर्ण करा कार घेण्याचे स्वप्न!

नवीन फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतींमुळं मारुती सुझुकीचं हे लिमिटेड एडिशन ग्राहकांसाठी खास ठरणार आहे.
Published on

मुंबई: मारुती सुझुकीने आपल्या Alto K10, Celerio आणि S-Presso कारसाठी 'Dream Series' नावाची स्पेशल एडिशन लॉन्च केली आहे. त्यांची किंमत 4.99 लाख रुपयांपासून सुरु होत असून फक्त जून 2024 साठी उपलब्ध आहे. नवीन फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतींमुळं मारुती सुझुकीचं हे लिमिटेड एडिशन ग्राहकांसाठी खास ठरणार आहे.

Alto K10 ड्रीम सीरिज VXI+ व्हेरियंटवर आधारित आहे. या कारमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि सुरक्षा प्रणाली यांसारखी खास फीचर्स आहेत. S-Presso ड्रीम सीरिज देखील VXI+ व्हेरियंटवर आधारित आहे. या कारमध्येही अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. रेग्युलर मॉडेल व्यतिरिक्त या एडिशनमध्ये अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.

S-Presso ड्रीम सिरीजला चाकांभोवती ब्लॅक क्लेडिंग, ब्लॅक आणि सिल्व्हर साइड मोल्डिंग, समोर, बाजूला आणि मागील बाजूस स्किड प्लेट्स आणि ग्रिल तसेच बूट लिडवर क्रोम ॲक्सेंट आहेत.

दुसरीकडे, मारुती सुझुकीने ऑफर केलेली सेलेरियो ड्रीम सीरीज LXI प्रकारावर आधारित आहे. या एडिशनमध्ये पायोनियर मल्टीमीडिया स्टिरिओ सिस्टम, स्पीकर आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे.

या तिन्ही वाहनांमध्ये 1.0-लिटर थ्री-सिलेंडर के-सीरीज पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 66bhp पॉवर आणि 89Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. सध्या ते केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.

logo
marathi.freepressjournal.in