New Maruti Swiftचं बुकींग सुरु, Tata, Hyundaiची वाढली धाकधूक

नव्या मारूती स्विफ्टचं बुकींग सुरू, अत्याधुनिक फीचर्ससोबत मिळणार जबरदस्त मायलेज...जाणून घेऊया काय आहे खास?
मारूती सुझुकी स्विफ्ट
मारूती सुझुकी स्विफ्टमारुती सुझुकी

New Maruti Suzuki Swift : गेल्या अनेक वर्षांपासून मारुती सुझुकीनं भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅकपैकी एक आहे. कंपनी लवकरच या कारचं नवं मॉडेल लॉन्च करणार आहे. लॉन्चपूर्वीच कंपनीनं या कारसाठी बुकींग सुरू केलं आहे. केवळ ११ हजार रुपये टोकन रक्कम भरून तुम्ही नव्या मारूती स्विफ्टचं बुकींग करू शकता. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन किंवा एरिना डीलरशिपच्या माध्यमातून तुम्ही ऑफलाइन बुकींग करू शकता.

सध्या बाजारात थर्ड जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट विकली जात आहे. स्विफ्टच्या लॉन्चिंगनंतर आतापर्यंत भारतात २९ लाख ग्राहकांनी ही कार खरेदी केली आहे. आधुनिक फीचर्सनी युक्त अशा कारकडे वाढणारा ग्राहकांचा कल पाहता कंपनीनं चौथ्या पिढीतील मारुती स्विफ्ट लॉन्च (New Gen Maruti Suzuki Swift ) करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार चौथ्या पिढीतील स्विफ्ट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लॉन्च केली जावू शकते.

आकर्षक लूकसोबतच दमदार मायलेज:

नवी स्विफ्ट मायलेजमध्येही दमदार असेल. सध्या भारतील कार बाजारात विक्री होत असलेल्या थर्ड जनरेशन स्विफ्टमध्ये K12 फोर सिलेंडर इंजिन आहे. रिपोर्टनुसार चौथ्या पिढीतील स्विफ्ट पूर्णपणे नव्या १.२ लीटर ३ सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येऊ शकते.

याशिवाय मारुती सुझुकी नवी स्विफ्ट केवळ पेट्रोलच नाही तर सीएजी व्हेरियंटमध्येही लॉन्च करणार आहे. सध्याच्या मारुती सुझुकी स्विफ्टचं सीएनजी व्हेरियंट ३०.९० किमी प्रतिलीटर मायलेज देतं. आता चौथ्या पिढीतील मारुती स्विफ्टकडूनही ग्राहकांना अशात दमदार मायलेजची अपेक्षा आहे.

अत्याधुनिक फीचर्स, शानदार लूक:

नव्या मारुती स्विफ्टमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये ९ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव कारमध्ये ६ एयरबँग्ज असतील. याव्यतिरिक्तही अनेक फीचर्स दिली जावू शकतात.

किती असेल किंमत?

सध्या तिसऱ्या पिढीतील मारुती सुझुकी स्विफ्टची किंमत सुमारे ६.२४ लाख ते ९.२८ लाख (एक्स शोरुम) आहे. परंतु नवी स्विफ्ट अनेक नव्या बदलांसह लॉन्च केली जात आहे. त्यामुळं या कारची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.

New Gen Maruti Swift ची सुरुवातीती किंमत सुमारे ७ लाख रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होऊ शकते. भारतीय कार बाजारातील Hyundai Grand i 10, Tata Tiago, Citroen C3 इत्यादी कारशी तिची स्पर्धा असेल.

logo
marathi.freepressjournal.in