कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?

मारुती सुझुकीने 9 मे रोजी फोर्थ जनरेशन स्पिफ्ट कार लॉन्च केली. आता कंपनी येत्या काही महिन्यांत ही कार सीएनजी पॉवरट्रेनसह सादर करण्याचा विचार करत आहे.
मारूती सुझुकी स्विफ्ट
मारूती सुझुकी स्विफ्टमारुती सुझुकी
Published on

मुंबई: मारुती सुझुकीने 9 मे रोजी फोर्थ जनरेशन स्पिफ्ट कार लॉन्च केली. आता कंपनी येत्या काही महिन्यांत ही कार सीएनजी पॉवरट्रेनसह सादर करण्याचा विचार करत आहे.

आगामी मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी मॉडेल 1.2 लिटर 3-सिलेंडर झेड-सीरीज पेट्रोल इंजिनसह येईल. पेट्रोल मॉडेलपेक्षा ते कमी पॉवर आणि टॉर्क निर्माण करणं अपेक्षित आहे. ही कार केवळ मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल.

किती असेल किंमत-

सध्या उपलब्ध असलेल्या नवीन स्विफ्ट हॅचबॅकची किंमत 6.49 लाख ते 9.64 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. आगामी Swift CNG व्हेरियंटची किंमत पेट्रोल व्हेरियंटपेक्षा सुमारे 90,000 ते 95,000 रुपये महाग असू शकते.

कार देणार बाईकएवढं मायलेज-

नुकत्याच लॉन्च झालेल्या नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट 24.8 ते 25.75 kmpl मायलेज देते. रिपोर्टनुसार, सीएनजी पॉवरट्रेन ऑप्शनमध्ये येणारी ही कार बाईकप्रमाणे 32 किमी/किलो मायलेज देऊ शकते. सध्या, नवीन स्विफ्ट सीएनजी मॉडेल लॉन्च करण्याबाबत ऑटोमेकरकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

काय असतील फीचर्स-

फीचर्सचा विचार करता, या कारमध्येही सध्याच्या मॉडेलप्रमाणेच फीचर्स असण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट हॅचबॅकला अद्ययावत डिझाइन केलं गेलं आहे. कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, एलईडी फॉग लाइट्स, 15-इंच अलॉय व्हील आणि एलईडी टेललाइट्स आहेत.

ही कार LXI, VXI, VXI (O), ZXI आणि ZXI प्लस व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. नवीन स्विफ्ट कारमध्ये 5 जण आरामात प्रवास करू शकतात. सिझलिंग रेड, पर्ल आर्क्टिक व्हाइट, मॅग्मा ग्रे, नोवेल ऑरेंज यासह अनेक आकर्षक रंगांमध्ये ही कार उपलब्ध आहे.

याशिवाय 9-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, ऑटो क्लायमेट कंट्रोल, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर, अर्कामिस-ट्यून साउंड सिस्टीम यासह अनेक नवीनतम फीचर्स मिळतात.

logo
marathi.freepressjournal.in