एलन मस्क, जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नाल्टच्या रांगेत झुकेरबर्गही; 'मेटा'च्या सीईओंचा २०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये प्रवेश

झुकेरबर्ग आता जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले
एलन मस्क, जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नाल्टच्या रांगेत झुकेरबर्गही; 'मेटा'च्या सीईओंचा २०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये प्रवेश
एक्स (@seautocure)
Published on

न्युयॅर्क : चर्चेतले आंतरराष्ट्रीय उद्योगपती एलन मस्क, जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या रांगेत मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनाही स्थान मिळाले आहे. २०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची संधी प्रवर्तक मेटाच्या मालकांना मिळाली आहे.

टेस्लाचे मुख्याधिकारी एलन मस्क, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि एलव्हीएमएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड अर्नाल्ट यांच्यासोबत मार्क झुकरबर्ग हे आता बिलियन क्लबमध्ये सहभागी झाले आहेत.

२०० डॉलर बिलियन क्लबमध्ये आत्तापर्यंत तीन सदस्य होते. टेस्ला आणि स्पेसएक्सचे एलन मस्क हे एकूण २७२ अब्ज डॉलरसह आघाडीवर आहेत. ॲमेझॉनचे जेफ बेझोस हे एकूण २११ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एलव्हीएमएचचे मुख्य काऱ्यकारी अधिकारी बर्नार्ड अर्नाल्ट हे २०७ अब्ज डॉलरच्या एकूण मूल्यासह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये मेटाचे मुख्य काऱ्यकारी अधिकारी असलेल्या झुकरबर्ग यांची एकूण संपत्ती ७३.४ अब्ज डॉलरने वाढली आहे. २०१ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह झुकेरबर्ग जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले.

एलन मस्क - २७२ अब्ज डॉलर

बर्नार्ड अर्नाल्ट - २०७ अब्ज डॉलर

मार्क झुकेरबर्ग - २०१ अब्ज डॉलर

जेफ बेझोस - २११ अब्ज डॉलर

logo
marathi.freepressjournal.in