
नवी दिल्ली : उत्तम ठरलेल्या २०२३ नंतर म्युच्युअल फंड उद्योगाने २०२४ मध्ये तब्बल १७ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेत भर घातली. आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड उद्योगाची एयूएम डिसेंबर २०२३ अखेर ५०.७८ लाख कोटींवरून २०२४ मध्ये (नोव्हेंबर अखेरपर्यंत) ६८ लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. या वर्षीच्या आकडेवारीमध्ये डिसेंबरच्या आकड्याचा समावेश नाही, जो २०२५ च्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. तर गेल्या चार वर्षांमध्ये, म्युच्युअल फंड उद्योगाने एकत्रितपणे त्याच्या एयूएममध्ये ३० लाख कोटी रुपयांची भर घातली आहे, ज्यामुळे क्षेत्राचा सातत्यपूर्ण चढता आलेख दिसून येतो. मजबूत शेअर बाजार, मजबूत आर्थिक वाढ आणि गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग यामुळे वाढीचा वेग कायम ठेवत म्युच्युअल फंड उद्योग उच्चांकावर पोहोचला आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, सकारात्मक कल २०२५ मध्येही कायम राहील.
कौस्तुभ बेलापूरकर, मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे संचालक-व्यवस्थापक संशोधन म्हणाले, २०२५ मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाच्या मालमत्तेमध्ये उत्तम गतीने वाढ होणे अपेक्षित आहे. किरकोळ गुंतवणूकदारांमधील वाढत्या प्रवेशामुळे, विशेषत: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे इक्विटी फंडांमध्ये (एसआयपी) ओघ मजबूत राहण्याची शक्यता आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडस्ट्री (ॲम्फी) च्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये ९.१४ लाख कोटी रुपयांचा निव्वळ ओघ दिसून आला, तसेच गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय ५.६ कोटींची वाढ आणि एसआयपीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तब्बल २.४ लाख कोटी रुपयांचे योगदान दिले.
उद्योगाने २०२२ मध्ये ‘एयूएम’मध्ये ७ टक्के वाढ आणि २.६५ लाख कोटी रुपयांची वाढ, तसेच २०२१ मध्ये जवळपास २२ टक्के वाढ आणि मालमत्ता बेसमध्ये सुमारे ७ लाख कोटी रुपयांची वाढ पाहिली. गेल्या चार वर्षांत, उद्योगाने एकत्रितपणे त्याच्या ‘एयूएम’मध्ये ३० लाख कोटी रुपयांची भर घातली आहे.
डिसेंबर २०२२ च्या अखेरीस मालमत्ता बेस सुमारे ४० लाख कोटी रुपये, डिसेंबर २०२१ अखेरीस ३७.७२ लाख कोटी रुपये आणि डिसेंबर २०२० मध्ये ३१ लाख कोटी रुपये होता.
२०२४ ने मागील दोन वर्षांच्या घसरणीनंतर उद्योग एयूममध्ये सलग १२ वी वार्षिक वाढ देखील नोंदवली. या वर्षी उद्योगातील वाढीला इक्विटी योजना, विशेषत: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) मधील गुंतवणुकीचा आधार मिळाला. बजाज फिनसर्व्ह एएमसीचे सीईओ गणेश मोहन म्हणाले, वित्तीयीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे इक्विटी मार्केट आणि म्युच्युअल फंडांमधील सहभागामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, जे म्युच्युअल फंड उद्योगातील एयूएमच्या लक्षणीय वाढीमध्ये दिसून येते. या बदलाला भारतीय अर्थव्यवस्थेच्या विस्तारामुळे आणि किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये वाढती आर्थिक जागरूकता, जे कमी खर्चात आणि अधिक सोयीसह जास्त परतावा मिळवू इच्छित आहेत, असे ते पुढे म्हणाले.
चार वर्षांत ‘एयूएम’मध्ये ३० लाख कोटी रुपयांची भर
वाढत्या ओघामुळे म्यु्च्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) वाढ नोव्हेंबर अखेरीस ६८ लाख कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली, तर २०२३ च्या अखेरीस ‘एयूएम३ ५०.७८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत २०२४ मध्ये ३३ टक्क्यांनी वाढ झाली. २०२३ मधील २७ टक्के वाढ आणि एयूएममध्ये रु. ११ लाख कोटींच्या वाढीपेक्षा जास्त होती.
नोव्हेंबरपर्यंत ९.१४ लाख कोटींचा ओघ
४५ कंपन्यांच्या म्यु्च्युअल उद्योगाने २०२४ मध्ये (नोव्हेंबरपर्यंत) एकूण ९.१४ लाख कोटी रुपयांचा ओघ आला, जो गेल्या वर्षी २.७४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होता. इक्विटी फंड, आर्बिट्रेज फंड आणि इंडेक्स फंड आणि ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांच्या सततच्या स्वारस्यामुळे हा मोठा प्रवाह असू शकतो. या वर्षीच्या ओघात इक्विटी-केंद्रित योजनांमध्ये ३.५३ लाख कोटी रुपये, हायब्रीड योजनांमध्ये १.४४ लाख कोटी रुपये आणि कर्ज योजनांमध्ये सुमारे २.८८ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश आहे.