Narendra Modi Car Collection : बंदुक, बॉम्ब सगळं फेल..! नरेंद्र मोदी वापरतात 'या' अलिशान कार, पाहा यादी

संपूर्ण देशाचा कारभार पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या कार वापरतात? ते ज्या कारनं प्रवास करतात, त्यांची खासियत काय?
Narendra Modi Car Collection
Narendra Modi Car Collection fpj

लोकसभा निवडणूक 2024चे निकाल नुकतेच जाहीर झाले. यंदाचा निकाल पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेऊ शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, संपूर्ण देशाचा कारभार पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या कार वापरतात? ते ज्या कारनं प्रवास करतात, त्यांची खासियत काय? प्रधानपद हे कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीत पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी जगातील सर्वात सुरक्षित गाड्यांचा वापर केला जातो. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या विविध वाहनांची माहिती घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या कार जगातील सर्वोत्तम कार आहेत.

BMW 7 Series 760 Li High-Security Edition: पंतप्रधान मोदींची पहिली अधिकृत कार BMW 7 सीरिज ही आहे. ही कार खूपच मजबूत आहे. AK-47 रायफलच्या हल्ल्यालाही ती सहन करू शकते. या कारचा खालचा भागही अतिशय मजबूत करण्यात आला आहे, जो बॉम्ब हल्ल्यालाही तोंड देऊ शकतो. इतकंच नाही तर कोणत्याही प्रकारच्या रासायनिक शस्त्रांपासून संरक्षण करण्यासाठी या कारमध्ये ऑक्सिजन टँक देखील आहेत.

ही कार केवळ मजबूतच नाही तर अतिशय आरामदायक आहे. विशेष प्रकारच्या टायरमुळे ही कार पंक्चर झाली किंवा टायर खराब झाला तरीही ती ताशी 80 किलोमीटर वेगाने चालवता येते.

या कारमध्ये 6 लिटर V12 इंजिन आहे. हे इंजिन 544bhp पॉवर देते. ही कार अवघ्या 6.2 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. तिचा कमाल वेग ताशी 210 किलोमीटर आहे.

Range Rover Sentinel: नरेंद्र मोदींना SUV ने प्रवास करायला आवडतं, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेसाठी रेंज रोव्हर सेंटिनेलही तैनात करण्यात आली आहे. ही कार बुलेटप्रुफही आहे आणि बॉम्ब तसेच बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करू शकते.

पंक्चर झालेल्या टायरवरही ही कार ताशी 80 किलोमीटर वेगाने 50 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. रेंज रोव्हर सेंटिनेलमध्ये 5-लिटर सुपरचार्ज V8 इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन अंदाजे 375 HP पॉवर निर्माण करते. या कारला 0 ते 100 किलोमीटरचा वेग येण्यासाठी फक्त 10.4 सेकंद लागतात. तिचा कमाल वेग ताशी 193 किलोमीटर आहे. या कारची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे.

Toyota Land Cruiser : जगातील सर्वात शक्तिशाली वाहनांपैकी एक असलेली टोयोटा लँड क्रूझर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत तैनात आहे. ही एक मोठी आणि मजबूत एसयूव्ही आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तिच्यामध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत.

या कारमध्ये 4.5 लिटर V8 इंजिन आहे. हे इंजिन 260 HP आणि 650 Nm टॉर्क निर्माण करते. ही टोयोटाची सर्वोत्तम आणि मजबूत एसयूव्ही मानली जाते.

Mercedes-Maybach S650: मोदी 2021मध्ये दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे मर्सिडीज-Maybach S650 मध्ये दिसले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या स्वागतासाठी जाताना ते या कारमधून गेले होते.

या कारमध्ये VR-10 सुरक्षा आहे. ही कोणत्याही कारवर उपलब्ध असलेली सर्वोच्च सुरक्षा आहे. Mercedes-Maybach S650 मध्ये 6 लिटर टर्बो ट्विन V12 इंजिन आहे. हे इंजिन 630 bhp पॉवर जनरेट करते. या कारची किंमत 12.5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Mahindra Scorpio SUV: महिंद्रा स्कॉर्पिओ हे या यादीतील सर्वात सामान्य वाहन वाटत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा विचार करून त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे हे वाहन बुलेटप्रुफ आहे. शिवाय बॉम्बस्फोटालाही तोंड देऊ शकते.

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्याला त्यांच्या आवडत्या बख्तरबंद महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये गेले होते.

logo
marathi.freepressjournal.in