आता WhatsApp वर एकाच वेळी ३२ जणांसोबत Video Call; 'स्पीकर स्पॉटलाइट'चे फीचरही आणले

Technology and Communication: मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वाखालील 'मेटा'ने आता व्हॉट्सॲपसाठी काही शानदार फीचर्सची घोषणा केली आहे.
आता WhatsApp वर एकाच वेळी ३२ जणांसोबत Video Call; 'स्पीकर स्पॉटलाइट'चे फीचरही आणले
Published on

Mark Zuckerberg: व्हॉट्सॲपचे नवनवीन अपडेट वेळोवेळी येत असतात. मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वाखालील 'मेटा'ने आता व्हॉट्सॲपसाठी काही शानदार फीचर्सची घोषणा केली आहे. व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलिंगमध्ये सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. याशिवाय, स्पीकर स्पॉटलाइट, स्क्रीन शेअरिंग विथ ऑडिओ असे फीचर्सही कंपनीने आणले आहेत. कंपनीने हे नवे अपडेट रोलआउट करण्यास सुरूवात केली असून लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होईल. सविस्तर जाणून घेऊया या फीचर्सबाबत...

स्पीकर स्पॉटलाइट

या फीचरमुळे व्हिडिओ कॉलदरम्यान बोलणारी व्यक्ती आपोआप 'हायलाइट' होते आणि त्यांना स्क्रीनवर प्रथम दाखवते. त्यामुळे व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी असलेल्या लोकांना कोण बोलत आहे हे समजणे सोपे होईल.

स्क्रीन शेअरिंग विथ ऑडिओ

व्हॉट्सॲपकडून दीर्घकाळापासून या फीचरची टेस्टिंग सुरू होती. आता ते रोलआउट करण्यास सुरूवात झाली आहे. व्हॉट्सॲप यूजर्स आता व्हिडिओ कॉलिंगदरम्यान ऑडिओसह स्क्रीन देखील शेअर करू शकतात. यापूर्वी स्क्रीन शेअरची सुविधा होती पण स्क्रीन शेअरसोबत ऑडिओ शेअरची सुविधा नव्हती.

व्हिडिओ कॉलमध्ये जास्त लोक

आता ३२ लोक एकाच वेळी व्हिडिओ कॉलमध्ये सामील होऊ शकतात. डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्ही ॲप्ससाठी व्हिडिओ कॉलिंग सदस्यांची संख्या ३२ असेल. आतापर्यंत डेस्कटॉप ॲपवर व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या ८ इतकीच मर्यादित होती. यामुळे मोठ्या ग्रुप्सना सहजपणे व्हिडिओ कॉलमध्ये सामील होणे शक्य होईल.

उत्तम ऑडिओ-व्हिडिओ क्वालिटी

व्हॉट्सॲप अनेक दिवसांपासून ऑडिओ आणि व्हिडिओची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करत आहे. यासाठी कंपनीने MLow codec हा नवा टूल आणला आहे. याच्या मदतीने नॉईज कॅन्सलेशन, इको कॅन्सलेशनच्या सुविधेत सुधारणा होईल आणि गोंगाटाच्या वातावरणातही स्पष्ट आवाज ऐकू येईल. याशिवाय जास्त रिझोल्यूशनमुळे व्हिडिओ कॉलिंगचा दर्जाही सुधारेल.

logo
marathi.freepressjournal.in