दररोज फक्त २५० रुपये वाचवा अन् व्हा लखपती...पोस्ट ऑफिसची मालामाल करणारी स्कीम

Public Provident Fund : सुरक्षित गुंतवणुकीसाठी आणि मजबूत परताव्यासाठी PPF स्कीम खूप लोकप्रिय आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर सरकारकडून तब्बल ७.१ टक्के व्याज दिलं जात आहे.
पोस्ट ऑफिस पब्लिक प्रोव्हिडंट फंड
पोस्ट ऑफिस पब्लिक प्रोव्हिडंट फंडप्रातिनिधिक फोटो

Post Office Public Provident Fund : आपणा सर्वांच्या काहीना काही इच्छा आंकाक्षा असतात. त्यांच्या पूर्ततेसाठी आपण आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवतो. ही रक्कम आपण अशा ठिकाणी गुंतवू इच्छितो, जिथे ती केवळ सुरक्षितच राहणार नाही तर आपल्याला मजबूत परतावा देखील मिळेल. यासाठी अनेक बचत योजना उपलब्ध आहे. परंतु पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंडामध्ये गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा कल असतो. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीनं ही योजना खूप फायदेशीर ठरते. या योजनेत तुम्ही दररोज फक्त २५० रुपये वाचवून स्वतःसाठी २४ लाख रुपयांचा निधी जमा करू शकता.

७% पेक्षा जास्त व्याज आणि करामध्येही सवलत:

पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंडामधील गुंतवणुकीवर केवळ उत्कृष्ट व्याज दिलं जात नाही, तर सरकार स्वतः तुमच्या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी देतं. PPF व्याजदराबद्दल बोलायचं झाल्यास गुंतवणुकीवर ७.१ टक्के व्याज दिलं जातं. यासोबतच पोस्ट ऑफिस स्कीममध्ये पैसे गुंतवल्यामुळं कराध्येही सवलत मिळते.

PPF योजना ही EEE श्रेणीची योजना आहे, म्हणजेच दरवर्षी त्यात जी काही गुंतवणूक केली जाते, ती पूर्णपणे करमुक्त राहते. याशिवाय गुंतवणूकदारांना मिळालेल्या व्याजावर तसेच मुदतपूर्तीवर मिळालेल्या निधीवर कोणताही कर भरावा लागत नाही.

तुम्ही 24 लाख रुपये कसे जमा करू शकाल?

आता आपण या योजनेत फक्त 250 रुपयांच्या रोजच्या बचतीसह 24 लाख रुपयांचा निधी कसा आणि केव्हा जमा करू शकतो याबद्दल बोलूया. जर तुम्ही दररोज 250 रुपयांची बचत केली तर तुमची दरमहा बचत 7500 रुपये होईल आणि वर्षभरात तुम्ही 90,000 रुपये वाचवाल. तुम्हाला ही रक्कम दरवर्षी PPF मध्ये 15 वर्षे गुंतवावी लागेल.

पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा १५ वर्षे आहे. म्हणजेच १५ वर्षांत तुमची एकूण ९०,००० रुपये प्रतिवर्षी ठेव १३,५०,००० रुपये होईल आणि त्यावर ७.१ टक्के दराने व्याज मिळालं, तर ते १०,९०,९२६ रुपये होईल. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २४,४०,९२६ रुपये मिळू शकतील.

५०० रुपये देऊन उघडता येते खाते:

पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीममध्ये तुम्ही फक्त ५०० रुपयांमध्ये खाते उघडू शकता. दरवर्षी जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. रिटर्न्स आणि टॅक्स बेनिफिट्स व्यतिरिक्त कर्ज सुविधेचा लाभही यामध्ये उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे असुरक्षित कर्जाच्या तुलनेत पीपीएफ गुंतवणुकीवर घेतलेले कर्ज स्वस्त आहे.

या योजनेत, गुंतवणूक अंतर्गत कर्ज तुमच्या ठेव रकमेच्या आधारावर दिले जाते आणि त्यासाठी तुम्हाला योजनेमध्ये मिळणाऱ्या व्याजापेक्षा एक टक्का जास्त रक्कम भरावी लागते. म्हणजेच पीपीएफ गुंतवणुकीतून कर्ज घेतल्यास तुम्हाला ८.१ टक्के दराने व्याज मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in