जर तुम्ही अजूनही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर लवकर फाईल करा. आयकर विभागाने 2022-23 साठी टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै निश्चित केली आहे. या तारखेनंतर तुम्ही आयकर रिटर्न भरल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. आयकर विभाग वारंवार करदात्यांना टॅक्स रिटर्न भरण्याचा सल्ला देत आहे. तुमचा टॅक्स रिटर्न वेळेवर भरून, दंड न भरता तुम्ही तुमचा कर परतावा देखील मिळवू शकता. ITR कसा भरायचा आणि परतावा कसा मिळवायचा, हेच आपण आज पाहणार आहोत.
'या' चूका टाळा:
आयटीआर दाखल करताना करदात्यांकडून किरकोळ चुका केल्या जातात. त्यामुळे त्यांचा परतावा मिळण्यास विलंब होतो. तुम्ही देखील पहिल्यांदाच आयकर रिटर्न भरत असाल तर काही चुका करणे टाळावे. तुमची योग्य माहिती ITR फाइलिंग पोर्टलवर भरायला हवी. बँक खात्याच्या तपशीलापासून ते मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीपर्यंत सर्वकाही योग्यरित्या भरल्याची खात्री करा. योग्य तपशील न भरल्यास रिफंड मिळण्यात अडचण येऊ शकते. तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस देखील मिळू शकते. आयकर विभाग तुमच्या सर्व तपशीलांची पडताळणी करतो, त्यानंतरच तो रिफंड जारी करतो.
तुमचा रिफंड असा करा चेक:
आयकर रिटर्न भरल्यानंतर तुम्ही रिफंड स्थिती तपासू शकता. यासाठी तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलला भेट द्यावी लागेल आणि Know Your Refund Status वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, मूल्यांकन वर्ष आणि मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP एंटर केल्यानंतर, तुम्हाला काही मिनिटांतच तुमच्या आयकर परताव्याची स्थिती दिसू लागेल.