
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांना ‘ग्लोबल फायनान्स’ या अमेरिकन मासिकाने सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून निवड करीत गौरव केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून त्यांची निवड झाली आहे.
गव्हर्नर दास यांना सलग दुसऱ्या वर्षी सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड २०२४ मध्ये ‘A+’ रेटिंग प्रदान करण्यात आले आहे, असे आरबीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे ‘ग्लोबल फायनान्स’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शक्तिकांत दास यांना हा सन्मान देण्यात आला.
‘ए+’ रेटिंग मिळालेल्या तीन सेंट्रल बँक गव्हर्नरच्या यादीत दास पहिल्या स्थानावर आहेत. ‘ग्लोबल फायनान्स’ मासिकाने एका निवेदनात म्हटले आहे की, महागाई नियंत्रित करणे, आर्थिक विकासाचे लक्ष्य साध्य करणे, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनात यश मिळवण्यासाठी ‘ए’ ते ‘एफ’ स्केलवर रेटिंग देण्यात आले. येथे ‘ए’ चमकदार कामगिरी दर्शवतो तर एफ’ संपूर्ण अपयश दर्शवतो. शक्तिकांत दास यांच्याव्यतिरिक्त, डेन्मार्कचे ख्रिश्चन केटल थॉमसन आणि स्वित्झर्लंडचे थॉमस जॉर्डन यांनाही सेंट्रल बँकर्सच्या ‘ए+’ श्रेणीत स्थान मिळाले आहे.
एसबीआयची सर्वोत्तम भारतीय बँक म्हणून निवड
ग्लोबल फायनान्स मासिकाने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ला २०२४ साठी भारतातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून घोषित केले आहे. वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ३१ व्या वार्षिक सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार समारंभात ग्लोबल फायनान्सने एसबीआयला २०२४ चा सर्वोत्कृष्ट बँक ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित केले. एसबीआयचे अध्यक्ष सी.एस. सेट्टी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बँकेला हा पुरस्कार त्यांच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करून अपवादात्मक सेवा प्रदान करण्याच्या आणि देशभरात आर्थिक समावेशनाला चालना देण्याच्या वचनबद्धतेसाठी मिळाला आहे.शकते जिथे केंद्रीय बँकांचे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण गमावले जाईल. असे झाले तर केंद्रीय बँका आर्थिक व्यवस्थेत उपलब्ध रोकड कशी तपासतील? त्यामुळे क्रिप्टोकरन्सी हा आर्थिक स्थिरतेसाठी मोठा धोका आहे, अशी चिंता भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शनिवारी वॉशिंग्टनमध्ये व्यक्त केली.