कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई; ऑनलाईन नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

बँक तिच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसह, विद्यमान ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवेल, असेही रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे.
कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई; ऑनलाईन नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी कोटक महिंद्रा बँकेला त्यांच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन ग्राहकांना नवीन क्रेडिट कार्ड देण्यापासून बंदी घातली आहे. नियामकाला बँकेच्या आयटी जोखीम व्यवस्थापनात गंभीर कमतरता आढळल्यानंतर तात्काळ प्रभावाने ही कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने केलेल्या आयटी तपासणीत २०२२ आणि २०२३ या वर्षांत अनेक आढळलेल्या त्रुटींचे निराकरण करण्यात बँकेला सतत अपयश आल्याच्या कारणाने ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने निवेदनात म्हटले आहे. सलग दोन वर्षे नियामक मार्गदर्शकतत्त्वांनुसार त्रुटी दाखवूनही बँकेने बँकेच्या आयटी जोखीम आणि माहिती सुरक्षा प्रशासनामध्ये कमतरता असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे कोटक महिंद्रा बँकेला त्यांच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन ग्राहकांना नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यापासून तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, बँक तिच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसह, विद्यमान ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवेल, असेही रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in