Gold-Silver: कस्टम ड्युटीत कपात केल्याने सोने-चांदी ३ हजारांनी झाले स्वस्त

Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्याच्या कस्टम ड्युटीत मोठी कपात जाहीर केल्यानंतर जळगाव आणि पुण्याच्या सराफ बाजारात सोने प्रति तोळा ३ हजारांनी स्वस्त झाल्याचे सांगण्यात येते.
Gold-Silver: कस्टम ड्युटीत कपात केल्याने सोने-चांदी ३ हजारांनी झाले स्वस्त
Published on

Union budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्याच्या कस्टम ड्युटीत मोठी कपात जाहीर केल्यानंतर जळगाव आणि पुण्याच्या सराफ बाजारात सोने प्रति तोळा ३ हजारांनी स्वस्त झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले. याआधी सोने-चांदीचे सीमा शुल्क १५ टक्के होते. आता यात कपात करून सीमा शुल्क थेट ६ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. मुंबईत सोन्याचे दर सकाळी ७२,६०९ रुपयांवर उघडले व दिवसअखेर त्यात तब्बल ३ हजार रुपयांनी घट होऊन ते ६९,६०२ रुपयांवर बंद झाले. सकाळी चांदी प्रति किलो ८७,५७६ रुपये होती, ती बजेटमधील करकपातीनंतर अडीच हजारांनी घटून ८४,९१९ रुपये झाली.

सोन्याच्या दरात घट झाल्याचे समजताच लगीनसराईत ज्याप्रमाणे सोने खरेदीसाठी गर्दी दिसून येते, तशा प्रकारे सोन्याच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली. त्यामुळे सराफा दुकानदारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. चांदीच्या दरातही मोठी घट झाली.

logo
marathi.freepressjournal.in