मुंबई : सीझेरिया, इस्रायल - : रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (रिलायन्स रिटेल) आणि डेल्टा गॅलील इंडस्ट्रीज, लिमिटेड (DELG/तेल अवीव स्टॉक एक्स्चेंज) यांच्यात संयुक्त करार झाला आहे. भारतीय परिधान बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून हा करार करण्यात आला आहे.
स्त्रिया, पुरुष आणि मुलांसाठी कपडे आणि डेनिम पोशाख यासाठी ही भागीदारी झाल्याचे आज भारतातील धोरणात्मक भागीदारीची घोषणा करताना सांगण्यात आले. दोन्ही कंपन्यांची ५०/५० टक्के संयुक्त भागीदारी असणार आहे.
रिलायन्स रिटेल पोर्टफोलिओमध्ये प्रमुख धोरणात्मक भागीदार म्हणून डेल्टा गॅलीलचे स्वागत करताना व्ही सुब्रमण्यम, व्यवस्थापकीय संचालक, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लि. म्हणाले की, भारतीय ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी समर्पित पोशाख नवकल्पना मंच स्थापन करण्याचा या भागीदारीचा मानस आहे. डेल्टा गॅलील, आपल्या नावीन्यपूर्णतेसाठी आणि उत्पादनातील उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध आहे. वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेमध्ये आपल्या पाऊलखुणा विस्तारण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घेतील आणि किरकोळ, घाऊक आणि डिजिटल चॅनेलवर त्यांचे पोशाख आणि सक्रिय वेअर ब्रँडचा पोर्टफोलिओ ऑफर करेल. सहयोगाद्वारे, डेल्टा गॅलील संयुक्त उपक्रमाला देखील समर्थन देईल, जे रिलायन्सच्या स्वतःच्या सुस्थापित ब्रँडसाठी उत्पादने डिझाइन आणि तयार करेल, असे डेल्टा गॅलीलचे सीईओ, आयझॅक डबाह म्हणाले.