फेक आंतरराष्ट्रीय कॉल ब्लॉक करण्याचे आदेश; नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारचे पाऊल

परदेशातून आलेले कॉल्स भारतातून आलेले भासतात. मात्र ते कॉलिंग लाइन आयडेंटिटी या फोन करणाऱ्याची ओळख पटवणाऱ्या तांत्रिक यंत्रणेमध्ये फेरफार करून परदेशातील सायबर-गुन्हेगारांनी केलेले असतात.
फेक आंतरराष्ट्रीय कॉल ब्लॉक करण्याचे आदेश; नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारचे पाऊल
छायाचित्र सौजन्य - canva

नवी दिल्ली : देशात माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांची फसवणूक सुरू आहे. ओटीपी, पासवर्ड पळवून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. तसेच भारतीय मोबाईल भासेल, असे आंतरराष्ट्रीय कॉल परदेशातून केले जातात. यातून आर्थिक गुन्हेगारी वाढीस लागत आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली असून भ्रष्ट आंतरराष्ट्रीय कॉल ब्लॉक करण्याचे आदेश दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना दिले आहेत.

परदेशातून आलेले कॉल्स भारतातून आलेले भासतात. मात्र ते कॉलिंग लाइन आयडेंटिटी या फोन करणाऱ्याची ओळख पटवणाऱ्या तांत्रिक यंत्रणेमध्ये फेरफार करून परदेशातील सायबर-गुन्हेगारांनी केलेले असतात. बनावट डिजिटल ओळख, फेडेक्स घोटाळे, सरकारी आणि पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत केलेली तोतयेगिरी, दूरसंचार विभाग/ट्राय अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनी क्रमांक खंडित करणे अशा प्रकरणांमध्ये अशा आंतरराष्ट्रीय बनावट कॉलचा गैरवापर झाला आहे. म्हणूनच, दूरसंचार विभाग आणि दूरसंचार सेवा प्रदाते यांनी, असे येणारे आंतरराष्ट्रीय बनावट कॉल्स ओळखून ते भारतीय दूरसंचार ग्राहकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून ते रोखण्यासाठी एक प्रणाली तयार केली आहे. त्याद्वारे असे कॉल्स रोखले जातील. हे आंतरराष्ट्रीय बनावट कॉल्स रोखण्याचे निर्देश, दूरसंचार सेवा कंपन्यांना दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in