बिझनेस
किरकोळ महागाईचा दिलासा; जानेवारीत पाच महिन्यांचा नीचांक
किरकोळ महागाईचा दर जानेवारीमध्ये ४.३१ टक्क्यांवर घसरला. मुख्यत: खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ महागाई दरात घसरण झाल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत दिसून आले.
नवी दिल्ली : किरकोळ महागाईचा दर जानेवारीमध्ये ४.३१ टक्क्यांवर घसरला. मुख्यत: खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ महागाई दरात घसरण झाल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत दिसून आले. ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई दर डिसेंबरमध्ये ५.२२ टक्के आणि जानेवारी २०२४ मध्ये ५.१ टक्के होता.
अन्न विभागामधील महागाई ६.०२ टक्के होती, जी डिसेंबरमधील ८.३९ टक्के आणि मागील वर्षीच्या महिन्यातील ८.३ टक्क्यांच्या तुलनेत खूप कमी आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ला दोन्ही बाजूंनी २ टक्क्यांच्या कमी - जास्तसह किरकोळ महागाई दर ४ टक्के राहील, याची खात्री करण्यास सरकारने सांगितले आहे.