किरकोळ महागाईचा दिलासा तर आयआयपीमध्ये घसरण

किरकोळ महागाईचा दिलासा मिळत असून एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आली आहे. किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात ४.७५ टक्क्यांवर आला असून ती गेल्या एक वर्षातील नीचांकी पातळी आहे.
किरकोळ महागाईचा दिलासा तर आयआयपीमध्ये घसरण
Published on

नवी दिल्ली : किरकोळ महागाईचा दिलासा मिळत असून एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आली आहे. किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात ४.७५ टक्क्यांवर आला असून ती गेल्या एक वर्षातील नीचांकी पातळी आहे. स्वयंपाकघरातील काही वस्तुंच्या किमती किरकोळ कमी झाल्याचा हा सकारात्मक परिणाम आहे.

दरम्यान, भारताची औद्योगिक उत्पादन वाढ तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. खाणकाम आणि उर्जा विभागांनी चांगली कामगिरी केली असली तरी, मुख्यत: उत्पादन क्षेत्राच्या सुमार प्रदर्शनामुळे एप्रिल २०२४ मध्ये तीन महिन्यातील सर्वात कमी ५ टक्क्यांवर आल्याचे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दिसून येते.

किरकोळ महागाई एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर; मेममध्ये ४.७५ टक्क्यांवर: सरकारी आकडेवारी

नवी दिल्ली : किरकोळ महागाईचा दिलासा मिळत असून एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आली आहे. किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात ४.७५ टक्क्यांवर आला असून ती गेल्या एक वर्षातील नीचांकी पातळी आहे. स्वयंपाकघरातील काही वस्तुंच्या किमती किरकोळ कमी झाल्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. सरकारने बुधवारी किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली. ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई दर एप्रिल २०२४ मध्ये ४.८३ टक्के आणि मे २०२३ मध्ये ४.३१ टक्के इतकी कमी होती.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात खाद्यपदार्थांची चलनवाढ ८.६९ टक्के होती, जी एप्रिलमधील ८.७० टक्क्यांवरून किरकोळ कमी झाली आहे. फेब्रुवारी २०२४ पासून किरकोळ महागाईचा दर घसरत चालला आहे. फेब्रुवारी मधील ५.१ टक्क्यांवरून एप्रिल २०२४ मध्ये ४.८ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.

सीपीआय चलनवाढ दोन्ही बाजूंनी २ टक्क्यांच्या फरकाने ४ टक्क्यांवर राहील याची खात्री करण्याची जबाबदारी सरकारने रिझर्व्ह बँकेला दिली आहे. आरबीआयने या महिन्याच्या सुरुवातीला २०२४-२५ साठी सीपीआय महागाई दर ४.५ टक्के, पहिल्या तिमाहीमध्ये ४.९ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ३.८ टक्के, तिसऱ्या तिमाहीमध्ये ४.६ टक्के आणि चौथ्या तिमाहीमध्ये ४.५ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला होता. रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वै-मासिक चलनविषयक धोरण जाहीर करताना किरकोळ महागाईबाबात सावध भूमिका घेतली आहे.

एप्रिलमध्ये औद्योगिक उत्पादनात ५ टक्क्यांपर्यंत घसरण; औद्योगिक उत्पादनाचा तीन महिन्यांचा नीचांक: सरकारी आकडेवारी

नवी दिल्ली : भारताची औद्योगिक उत्पादन वाढ तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. खाणकाम आणि उर्जा विभागांनी चांगली कामगिरी केली असली तरी, मुख्यत: उत्पादन क्षेत्राच्या सुमार प्रदर्शनामुळे एप्रिल २०२४ मध्ये तीन महिन्यातील सर्वात कमी ५ टक्क्यांवर आल्याचे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दिसून येते.

औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आआयपी) च्या संदर्भात मोजली जाणारी कारखाना उत्पादन वाढ मार्चमध्ये ५.४ टक्के आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये ५.६ टक्के होती. तर जानेवारी २०२४ मध्ये आयआयपीचा नीचांक ४.२ टक्के होता. तर आर्थिक वर्ष २०२३ -२४ साठी आयआयपी वाढ ५.९ टक्के होती जी मागील आर्थिक वर्षातील ५.२ टक्के होती.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या निवेदनानुसार एप्रिल २०२३ मध्ये भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक ४.६ टक्क्यांनी वाढला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, खाणकाम उत्पादन वाढीचा वेग एप्रिलमध्ये ६.७ टक्क्यांवर पोहोचला असून मागील वर्षीच्या महिन्यात ५.१ टक्क्यांनी वाढला होता. तर उत्पादन क्षेत्राची वाढ गेल्या वर्षीच्या ५.५ टक्क्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये ३.९ टक्क्यांपर्यंत घसरली. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात १.१ टक्क्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये वीजनिर्मिती १०.२ टक्क्यांनी वाढली.

वापर-आधार वर्गीकरणानुसार, भांडवली वस्तूंच्या विभागातील वाढ एप्रिल २०२४ मध्ये ३.१ टक्क्यांपर्यंत घसरली असून मागील वर्षीच्या वरील महिन्यात हा दर ४.४ टक्के होता. या वर्षी एप्रिलमध्ये ग्राहक टिकाऊ वस्तूंचे उत्पादन ९.८ टक्क्यांनी वाढले. एप्रिल २०२३ मध्ये तो २.३ टक्क्यांनी घसरला होता. एप्रिल २०२३ मध्ये ११.४ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत अहवालाच्या महिन्यात ग्राहक अ-टिकाऊ वस्तूंचे उत्पादन २.४ टक्क्यांनी कमी झाले.

आकडेवारीनुसार, पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तूंनी एप्रिल २०२४ मध्ये ८ टक्क्यांची वाढ नोंदवली असून मागील वर्षी वरील महिन्यात १३.४ टक्के वाढ झाली आहे. प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात या वर्षी एप्रिलमध्ये ७ टक्के वाढ झाली आहे, जी वर्षभरापूर्वी वरील महिन्यात १.९ टक्क्यांवरून वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in