RBI Bulletin: किरकोळ महागाई हळूहळू कमी होतेय; परंतु 'हा' चिंतेचा विषय!

किरकोळ महागाई हळूहळू कमी होत आहे. परंतु अस्थिर आणि वाढलेल्या...
RBI Bulletin: किरकोळ महागाई हळूहळू कमी होतेय; परंतु 'हा' चिंतेचा विषय!

मुंबई : किरकोळ महागाई हळूहळू कमी होत आहे. परंतु अस्थिर आणि वाढलेल्या खाद्यपदार्थांच्या किमती हा चिंतेचा विषय आहे, असे आरबीआय बुलेटिनमध्ये बुधवारी म्हटले आहे. जून २०२४ बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी’ वरील लेखात म्हटले आहे की, २०२४ च्या पहिल्या तिमाहीत जागतिक वाढ लवचिक होती आणि अनेक केंद्रीय बँकांनी महागाई दरात घसरण होत असल्याचे लक्षात घेऊन कडक पतधोरण जाहीर करणे टाळले.

भारताचा जीडीपी दर जगात सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. तसेच आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये पहिल्या तिमाहीत जीडीपी दर जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच, नैऋत्य मॉन्सून लवकर दाखल झाल्याने कृषी क्षेत्र उत्तम राहण्याचा अंदाज आहे, असे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देबब्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील एका चमूने लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

किरकोळ महागाई दर हळूहळू कमी होत आहे. मात्र, खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीं अजूनही चिंतेचा विषय असल्याने मुख्य व्याजदरात कपात करण्यातील अडथळा आहे, असे लेखक म्हणाले. या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयच्या पतधोरणविषयक धोरण समितीने (एमपीसी) पॉलिसी रेपो रेट ६.५० टक्क्यांवर कायम ठेवला. आरबीआयने म्हटले आहे की बुलेटिन लेखात व्यक्त केलेले विचार लेखकांचे आहेत आणि ते मध्यवर्ती बँकेच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in