रुपयाचा नवा नीचांक; अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १४ पैशांनी लोळण

भारतीय चलन बाजारात गुरुवारी रुपयाने १४ पैशांची लोळण घेतली. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८५ ची पातळी ओलांडत ८५.०८ या नव्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला.
रुपयाचा नवा नीचांक; अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १४ पैशांनी लोळण
Published on

मुंबई : भारतीय चलन बाजारात गुरुवारी रुपयाने १४ पैशांची लोळण घेतली. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८५ ची पातळी ओलांडत ८५.०८ या नव्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयानंतर अमेरिकन डॉलर मजबूत झाला.

विदेशी मुद्रा व्यापाऱ्यांनी सांगितले की, भारतीय रुपयाने प्रथमच ८५ ची पातळी ओलांडली आणि गुरुवारी तो नवीन नीचांकी पातळीवर घसरला, कारण यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदराबाबत अधिक सावध धोरण अवलंबण्याचे संकेत दिले. त्यामुळे भारतीय रुपयासह उदयोन्मुख बाजारपेठांतील चलनांवर दबाव वाढला.

इंटरबँक फॉरेक्स बाजारात गुरुवारी सकाळी रुपया कमजोर उघडला आणि डॉलरच्या तुलनेत ८५ ची पातळी ओलांडली. दिवसअखेरीस अमेरिकन चलनाच्या तुलनेत तो ८५.०८ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. मागील बंदच्या तुलनेत रुपयाने १४ पैशांची घसरण नोंदवली. आयातदारांकडून डॉलरची मागणी, परदेशी निधी बाहेर पडणे आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांच्या भावना आणखी दुखावल्या गेल्या.

बुधवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३ पैशांनी घसरून ८४.९४ वर बंद झाला. फेडरल रिझर्व्हचा व्याजदराबाबत निर्णय आणि जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाल्याने रुपया नकारात्मक राहण्याची आमची अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in