
नवी दिल्ली : भारताच्या २५० अब्ज अमेरिकन डॉलर आयटी सेवा क्षेत्रात आर्थिक वर्ष २०२५ मध्ये पगारवाढ मध्यम राहण्याचा अंदाज आहे, कारण कंपन्या जागतिक आर्थिक अनिश्चितता, वाढत्या कुशल कामगारांची कमतरता आणि एआयचा वाढता स्वीकार आदींच्या पार्श्वभूमीवरील तज्ज्ञांनी वरील अंदाज व्यक्त केला.
आयटी उद्योगातील तज्ज्ञांनी सरासरी वेतन वाढ ४-८.५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीय कमी आहे. पगारवाढीवरील कमी खर्च म्हणजे नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याकडे वळण्याचे कंपन्यांचे संकेत आहे.
या वर्षी पगारवाढीचा दृष्टिकोन खूपच सावध आहे, असे टीमलीज डिजिटलचे व्हीपी कृष्णा विज यांनी नमूद केले. उद्योग क्षेत्रातील कंपन्या चार टक्के ते ८.५ टक्के श्रेणीत वाढ करू शकतात, जे मागील वर्षांपेक्ष कमी आहे. मुख्यत्वे जागतिक आर्थिक आव्हाने, अर्थव्यवस्था मंदावणे, विवेकी खर्च कमी करणे आणि व्यावसायिक प्राधान्यक्रम बदलणे यामुळे पगारवाढीवर परिणाम होत आहे, असे त्यांनी नमूद केले.
कंपन्या कौशल्य-आधारित वेतनाकडे वळत आहेत, खर्च कार्यक्षमतेसाठी टियर II नियुक्तीचा फायदा घेत आहेत. पगारवाढीऐवजी, रिटेन्शन बोनस, ESOPs आणि प्रकल्प-आधारित प्रोत्साहन भरपाई धोरण म्हणून लागू केले जात आहेत.